पुणे ः ” देशात विचारभिन्नता नाही, तर विचारशून्यता ही सर्वात मोठी समस्या आहे. विचारवंत व साहित्यिकांनी राजाच्या विरूद्ध परखड विचार मांडावे. आणि ते सहन करण्याची राजाची तयारी असावी.” असे मत केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मांडले.
कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या संत ज्ञानेश्वर हॉल येथे माईर्स एमआयटी विश्वशांती केंद्र (आळंदी) व नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा.डॉ. एस.एन. पठाण अमृत महोत्सवी गौरव ग्रंथ (सांप्रदायिक सद्भावनेचा आदर्श) च्या प्रकाशन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
मराठी साहित्य संम्मेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस हे सन्मानीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हेाते.
नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.मंगेश तु. कराड आणि डॉ. सर्फराज पठाण उपस्थित होते.
या प्रसंगी नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण यांच्या विशेष सत्कार व सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
नितीन गडकरी म्हणाले,” परखड विचारांवर राजाने चिंतन करणे हीच लोकशाहीची सर्वात मोठी परीक्षा आहे. मतभिन्नता ही लोकशाहीला मान्य नाही. त्यामुळेच दुसर्यांचे मत आपल्या विरोधात असले, तरी त्याचा सन्मान करणे हे लोकशाही मानणार्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे.”
राज्यघटनेने सर्वांना धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे. परंतु, जात व धर्म यावर आधारित विषमता अयोग्य आहे. राष्ट्राच्या पुननिर्माणाचे स्वप्न साकार करायचे तर या गोष्टी चालणार नाहीत. कोणी कोणाची कशी भक्ती करावी ही वैयक्तिक गोष्टी आहेत.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, ” राजकीय नेत्यांनी सर्वधर्मसमभाव संपवला. गडकरींचे राजकीय जीवन निष्कलंक असुन तयांची भुमिका कायम लोकशाहीवादीच राहिली. देशाच्या १४० कोटींना नवा रस्ता दाखविणारे ते बहुआयामी नेतृत्व आहे. वर्तमान काळात संवादाच्या पुलाची गरज असून हिंदू मुस्लिम ऐक्य जपणे गरजेचे आहे.”
डॉ. पठाण म्हणाले,” गावाने मला सांप्रदायिक सद्भभावना शिकविली. जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नव्हता, परंतू घराच्या गरिबीमुळे शिक्षण होईल का नाही हे कळत नव्हते. परंतू सातार्याला कमवा शिकवा योजनेतून संपूर्ण शिक्षण पूर्ण केले. नंतर राज्य शिक्षण संचालक आणि नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू या पदापर्यंत पोहचलो.”
याप्रसंगी सर्जराव निमसे यांनी विचार मांडले. डॉ. सर्फराज पठाण यांनी प्रास्ताविक केले.
डॉ. शालिनी टोंपे यांनी सूत्रसंचालन केले.
देशात विचार शुन्यता सर्वात मोठी समस्या केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
RELATED ARTICLES
New Delhi
haze
21.1
°
C
21.1
°
21.1
°
64 %
1kmh
0 %
Sat
25
°
Sun
34
°
Mon
37
°
Tue
39
°
Wed
39
°