पिंपरी,- महिलांना सशक्त आणि सक्षम करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातून महायुती सरकारने केले आहे. नारीवंदन विधेयक, मुख्यमंत्री लाडकी बहीण यांसारख्या योजनांच्या माध्यमातून नारी ही वंदनीय आहे. हा विश्वास देणाऱ्या भाजप सरकारला निवडून आणण्याची जबाबदारी आपली असल्याचे भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष व विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ म्हणाल्या.
तसेच, भोसरी विधानसभेतील आमदार महेश लांडगे याच तत्वावर काम करत असून स्त्री शक्तीच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या, महिलांना इंद्रायणी थडी च्या माध्यमातून सशक्त व्यासपीठ मिळवून दिले आहे. समाजातील सर्व घटकांना मदत करण्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या आमदार महेश लांडगे यांच्या हॅट्रिक साठी महिला शक्तीने पुढे यावे असे आवाहन चित्रा वाघ यांनी केले.
महायुतीचे भोसरी विधानसभेतील भाजपचे उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ महिला निर्धार मेळाव्याचे भोसरी इंद्रायणी नगर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चित्रा वाघ बोलत होत्या. या कार्यक्रमाला भाजप महिला मोर्चा, महिला आघाडी तसेच विविध मंडल मधील प्रमुख पदाधिकारी महिला उपस्थित होत्या.चित्रा वाघ म्हणाल्या की, महाविकास आघाडीचे धोरण हे महिला विरोधी आहे. महायुतीने आणलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विरोधकांच्या डोळ्यात खूपत आहे. या योजनेमुळे अनेक महिलांना आर्थिक सक्षम केले असून छोटे-मोठे व्यवसाय करण्यासाठी त्यांना भांडवल उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे अनेक महिला महायुती बरोबर जोडल्या गेल्या आहेत. महाविकास आघाडीला महिलांचा हाच पाठिंबा खूपत आहे. ते ही योजना बंद करण्यासाठी मागेपुढे पाहणार नाही. ही योजना अशीच पुढे चालू ठेवण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याची आपली जबाबदारी आहे.
नारीशक्तीला वंदनीय मानणाऱ्या महेश लांडगे यांना साथ द्या!
चित्रा वाघ यांचे मतदारांना आवाहन
RELATED ARTICLES
New Delhi
clear sky
42.9
°
C
42.9
°
42.9
°
36 %
0.7kmh
0 %
Sun
45
°
Mon
43
°
Tue
43
°
Wed
45
°
Thu
42
°