24.1 C
New Delhi
Friday, March 14, 2025
Homeमहाराष्ट्रपिंपरी-चिंचवडचा नावलौकिकसाऱ्या जगात जाण्यासाठी प्रयत्न करूयात - कृष्णकुमार गोयल

पिंपरी-चिंचवडचा नावलौकिकसाऱ्या जगात जाण्यासाठी प्रयत्न करूयात – कृष्णकुमार गोयल

पिंपरी- पिंपरी चिंचवड शहर वाढत्या कारखानदारी मुळे जगाच्या आऔद्योगिक नकाशावर गेले आहे. धार्मिक सलोखा असणारे हे शहर शिक्षण, क्रीडा, कला, नाट्य, संस्कृती, संशोधन, आयटी, AI अशा सर्वच क्षेत्रात प्रगती करून जगात अव्वल दर्जाचे शहर व्हावे यासाठी आपण साऱ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत. असे प्रतिपादन प्रख्यात उद्योगपती कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष, कृष्णकुमार krushankumar goyal यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय मराठी पत्रकार संस्था संलग्न पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनाचे औचित्य साधून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कृष्णकुमार गोयल यांचा कायनटीक ग्रुपचे अध्यक्ष अरुण फिरोदिया यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर होते, महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे, अध्यक्षा सायली कुलकर्णी उपस्थित होते.

कृष्णकुमार गोयल पुढे म्हणाले, “पिंपरी-चिंचवडने pimpari chinchawadमला घडविले. शहराशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. शहरातील पत्रकारांनी एकत्र यावे. पुण्याप्रमाणे शहरात पत्रकार संघाची स्वतंत्र इमारत उभी करावी. त्यासाठी आवश्यक ती मदत केली जाईल. या पुरस्कारामुळे माझ्यावरील जबाबदारी वाढली आहे असे मी मानतो असे सांगून उपस्थित सर्व पत्रकारांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
24.1 ° C
24.1 °
24.1 °
50 %
2.1kmh
20 %
Thu
26 °
Fri
36 °
Sat
35 °
Sun
35 °
Mon
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!