24.1 C
New Delhi
Thursday, March 13, 2025
Homeमहाराष्ट्रपिंपरी चिंचवड शहरवासियांना घडले संघशक्तीचे दर्शन

पिंपरी चिंचवड शहरवासियांना घडले संघशक्तीचे दर्शन

पिंपरी चिंचवड -शिस्तबध्दरित्या ओळीत चालणारे एकसारख्या संघ गणवेशातील दंडधारी स्वयंसेवक, लयबद्ध रचना सादर करीत संपूर्ण वातावरण भारावून टाकणारे घोषपथक आणि मध्यभागी डौलात फडकणारा भगवा ध्वज अन् त्यावर नागरिकांकडून होत असलेली पुष्पवृष्टी स्वागत! निमित्त होते पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी पथसंचलनाचे.यावर्षी संघाने १०० व्या वर्षात पदार्पण केले असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्व होते.राष्ट्रहित व सेवा कार्यासाठी सदैव कटिबद्ध असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विजयादशमी निमित्याने शहरात पिंपरी चिंचवड शहरातील तब्बल २६ ठिकाणी देहूरोड आकुर्डी, रावेत,हिंजवडी पूनावळे, वाकड थेरगाव, चिंचवड पूर्व – पश्चिम, पिंपरी, काळेवाडी, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, सांगवी, कासारवाडी, आळंदी, मोशी, संभाजी नगर, चिखली,आळंदी, निगडी या भागात सकाळी तर देहू,संत तुकाराम नगर, दिघी, चऱ्होली ,भोसरी, इंद्रायणी नगर भागात सायंकाळी नियोजित मार्गावर संघ गणवेशातील स्वयंसेवकांचे सदंड पथसंचलन उत्साहात संपन्न झाले. घोषाच्या तालावर हजारो स्वयंसेवकांनी संचलनात सहभाग घेऊन सामूहिकतेचे दर्शन घडविले. तत्पूर्वी जेष्ठ उद्योजक स्व. रतन टाटा यांना स्वयंसेवकांनी श्रद्धांजली अर्पण केली यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रमुख अतिथी, लोकप्रतिनिधी विविध भागातील संचलनात सहभागी झाले होते. ठिकठिकाणी नागरिकांनी उस्फूर्तपणे पुष्पवृष्टी , भारत माता की जय च्या जयघोषात रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून भव्य स्वागत केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
24.1 ° C
24.1 °
24.1 °
50 %
2.1kmh
20 %
Thu
26 °
Fri
36 °
Sat
35 °
Sun
35 °
Mon
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!