पुणे – पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरण अजूनही ताजे असतानाच आणखी एका अल्पवयीन मुलाकडून पुण्यातील वानवडीत भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. केवळ १४ वर्षांच्या मुलाने टँकर चालवत अनेकांना धडक दिली आहे. यामध्ये दोन मुली व एक महिला गंभीर जखमी झाली आहे. यामुळे एका १४ वर्षांच्या मुलाच्या हातात टँकर चालवायला दिला कुणी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर सततच्या या घटनांमुळे पुणे पार हादरुन गेलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातल्या वानवडी येथे भरधाव टँकरने सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या मुलांना, तसेच एका दुचाकीवरुन जाणाऱ्या महिलेलाही धडक दिली. सकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला. हा टँकर केवळ १४ वर्षांचा मुलगा चालवत होता. नागरिकांनी हा टँकर अडवून अल्पवयीन मुलाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.
अधिक माहिती अशी की, दुचाकीवरून कुस्ती प्रशिक्षक संतोष ढुमे आणि त्यांची पत्नी जात होती. त्यांच्या तालमीत शिकणाऱ्या मुली व्यायामासाठी रस्त्यावरून धावत होत्या. टँकरची दुचाकीला धडक बसताच त्यांची पत्नी दुचाकीवरून उडून थेट समोर रस्त्यावर पडली. तर, टँकरखाली दोन मुली आल्या. स्वत: ढुमे यांनी या मुलींना बाहेर काढले. या अपघातात मुलीही जखमी झाल्या आहेत.
पुण्यात कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर देखील अनेक गंभीर अपघात घडत आहेत. एका हायवा ट्रकनं मार्केटयार्ड येथे एका महिलेला चिरडलं होतं. तसेच, कात्रज येथे एसटी बसच्या धडकेत अभियंता तरुणीचा प्राण गेला होता. उंड्री येथे ट्रक दुचाकीच्या झालेल्या अपघातात एका तरुणीला जीव गमवावा लागला होता. एका पाठोपाठ एक असे अनेक अपघात घडत असताना देखील अनेक अल्पवयीन मुलं वाहने चालवताना शहरात दिसत आहेत. त्यातच अवजड टँकर अवघ्या १४ वर्षांच्या मुलाच्या ताब्यात देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.
पुण्यात चालले तरी काय?
अल्पवयीन मुलाने टँकर चालवत अनेकांना दिली धडक
RELATED ARTICLES
New Delhi
haze
12.1
°
C
12.1
°
12.1
°
66 %
1.5kmh
0 %
Thu
25
°
Fri
25
°
Sat
25
°
Sun
25
°
Mon
20
°