29.7 C
New Delhi
Tuesday, July 1, 2025
Homeमहाराष्ट्रभव्य पुरातन शिवालयात होणार मंडईच्या शारदा गजाननाची प्राणप्रतिष्ठापना

भव्य पुरातन शिवालयात होणार मंडईच्या शारदा गजाननाची प्राणप्रतिष्ठापना

मंडळाचे गणेशोत्सवाचे १३१ वे वर्ष

पुणे: पाषाणात कोरलेल्या पुरातन शिवालयात अखिल मंडई मंडळाचे शारदा गजानन विराजमान होणार आहेत. मंडळाच्या वतीने यंदा ‘दगडांवर कोरलेल्या लेण्यांमधील महादेवाचे भव्य शिवालय’ ही सजावट करण्यात येणार आहे. यामध्ये महादेवाची भव्य पिंड व त्यावर सतत जलाभिषेक हे सजावटीचे विशेष आकर्षण असणार आहे, अशी माहिती अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी दिली.

शिवालयात १६ हत्ती, ६० लहान मोठ्या आकाराच्या घंटा, १५ मोठे त्रिशुळ, मंडपाच्या मध्यभागी १० फूटाचा नंदी, महादेव व पार्वतीचे भव्य चित्र असेल. कला दिग्दर्शक विशाल ताजणेकर व त्यांचे सहकारी गजेंद्र पांडे यांचे मार्गदर्शनाखाली ६० कुशल कारागीर १ महिन्यापासून शिवालय साकारण्याचे काम करीत आहेत.

शनिवार दिनांक  ७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता आगमन मिरवणुकीची सुरुवात होईल. मिरवणुकीच्या अग्रभागी न्यू गंधर्व बॅन्ड पथक, स्वराज्य, सामर्थ्य हे ढोल पथक असतील. श्री शारदा गजाननाची प्रतिष्ठापना दुपारी १२ वा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे  प्र.कुलगुरु डॉ. पराग काळकर आणि त्यांच्या पत्नी अंजली काळकर यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.

अण्णा थोरात म्हणाले, ज्या ठिकाणी शिवलिंग स्थापित असते, त्याला शिवालय असे म्हटले जाते. मंडळाच्या वतीने साकारण्यात येणाऱ्या शिवालयात आल्यावर दगडामध्ये कोरलेल्या प्राचीन मंदिरात आल्याचा अनुभव भाविकांना होणार आहे. अतिशय बारकाईने कलाकारांनी सजावटीचे काम केले आहे. भव्य शंकराची पिंड आणि त्यावरील जलाभिषेक विशेष आकर्षण ठरणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
29.7 ° C
29.7 °
29.7 °
61 %
2.7kmh
5 %
Tue
30 °
Wed
38 °
Thu
35 °
Fri
36 °
Sat
34 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!