पुणे- ना. चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि कोथरूडचे आमदार यांच्या माध्यमातून तसेच पुणे जिल्हा महिला आघाडी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, जिल्हाध्यक्ष केतकी कुलकर्णी ketaki kulkarni यांच्या संयुक्त विद्यमाने, भव्य ब्राह्मण मेळावा, शुभारंभ लॉन्स येथे आयोजित करण्यात आला होता. ना. चंद्रकांत पाटील तसेच अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.गोविंदजी कुलकर्णी यांच्या हस्ते या भव्य ब्राह्मण मेळाव्याचे उद्घाटन झाले याप्रसंगी ६५० पेक्षा जास्त ब्रह्मवृंद उपस्थित होते.केतकी कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात, संघटनात्मक सामाजिक कार्यासाठी, अशा मेळाव्यांची गरज प्रतिपादित केली. ना. चंद्रकांत दादा पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात केतकी कुलकर्णी यांनी मेळाव्यासाठी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक केलें आणि भारतीय संस्कृतीवर आधारित फॅशन शो आयोजित करण्यात आला होता.
या आगळ्यावेगळ्या संकल्पनेचे स्वागत केले.भारतीय जनता पक्षाचे कोथरूड दक्षिण मंडल चे अध्यक्ष डॉ. संदीप जी बुटाला तसेच शहर सरचिटणीस श्री पुनीत जोशी, मा नगरसेविका माधुरीताई सहस्रबुद्धे, श्री जयंत भावे, श्री गिरीश खत्री, एडवोकेट सौ प्राची, श्री व सौ मिताली सावळेकर, तसेच महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री मंदार रेडे, लक्ष्मीकांत धडफळे, अमोघ पाठक, सचिन कुलकर्णी, मुकुंद कुलकर्णी, सुषमा वैद्य व अनेक मान्यवर उपस्थित होते.सुप्रसिद्ध गायिका चैत्राली अभ्यंकर यांचा श्रावण सरी हा सुगम संगीताचा सुश्राव्य कार्यक्रम झाला. महिलांनी नृत्यात सहभागी होऊन गायनाचा आनंद लुटला.फॅशन शो साठी 70 जणी होत्या , आणि या फॅशन शोचे परीक्षण करण्यासाठी कलाक्षेत्रातील तीन व्यासंगी शक्ती पीठे म्हणजे कविता ताई कोपरकर, अमिरा ताई पाटणकर, ऋचा ताई जोशी यांना आमंत्रित केले होते.
हे परीक्षण करताना खूप आनंद झाला व खूप मजा आली असे सर्वच परीक्षकांनी मत व्यक्त केले.
या भव्य ब्राह्मण मेळाव्यात श्रावण मासानिमित्त, श्रावण कोपरा ही संकल्पना राबवण्यात आली. यामध्ये श्रावणात येणाऱ्या सणांचे व विशिष्ट दिवसांचे प्रतिकात्मक स्वरूप मांडण्यात आले. अमृता मेढेकर, अनिता काटे, अश्विनी औरसंग, स्वाती घुमरे आणि राजश्री कुलकर्णी यांनी यासाठी खूप मेहनत घेतली व छान सादरीकरण केले.महासंघाच्या प्रदेशाध्यक्ष मोहिनीताई पत्की तसेच प्रदेश कार्याध्यक्ष माननीय श्री निखिल दादा लातूरकर यांनी या मेळाव्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.
पुणे जिल्हा महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, ऋचा पाठक गीता देशमुख, जयश्री घाटे शिल्पा महाजनी मौसमी बोकरे, ऋता वर्धे, वृषाली कुलकर्णी, वैशाली कमाजदार, आकांक्षा देशपांडे, प्राजक्ता देवस्थळी, रजनी ओक, पल्लवी गाडगीळ, वंदना धर्माधिकारी, सीमा ताई चांदेकर यासर्वांचे तसेच सर्व जिल्हा, प्रदेश, राष्ट्रीय पदाधिकारी यांचे उत्तम सहकार्य लाभल्याने हा कार्यक्रम सुपर डूपर हिट झाला असे म्हणत केतकी ताईंनी सर्वांचे आभार मानले.पुरणपोळीचे सुग्रास भोजन करून सर्वस तृप्त झाले व जेवण अतिशय चविष्ट असल्याचे सर्वांनीच नमूद केले.फॅशन शो मध्ये तीन वयोगटातून प्रत्येकी तीन बक्षिसे देण्यात आली.तसेच एक उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.त्यानंतर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची नियुक्तीपत्र देण्यात आली.पसायदान म्हणून या भव्य ब्राह्मण मेळाव्याची सांगता झाली.