18.1 C
New Delhi
Sunday, December 1, 2024
Homeमहाराष्ट्रमाजी नगरसेवक चंद्रकांत नखातेंचा पक्षाला रामराम

माजी नगरसेवक चंद्रकांत नखातेंचा पक्षाला रामराम

चिंचवड : चिंचवड विधानसभा निवडणुकीसाठी तीव्र इच्छुक असलेले भाजपचे माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. कालच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्यासाठी काळेवाडीत जाहीर सभा घेतली. कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचा मंत्र दिला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी नखाते यांनी राजीनाम्याचे पत्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवून भाजपला रामराम ठोकला आहे. त्यामुळे शहर भाजपमध्ये सर्वच आलबेल नसल्याचे समजत आहे.नखाते यांनी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, ” साहेब आजपर्यंत मी भारतीय जनता पक्षाचे पूर्ण वेळ काम केले. पक्षाच्या विचाराचा एक एक व्यक्ति सोबत घेवून मी पक्षाची विचारधारा तळागाळात रुजविण्याचे काम केले. दिवंगत आमदार स्व. लक्ष्मण जगताप यांना 2014 आणि 2019 अशा दोनवेळा मताधिक्य देण्यात सिंहाचा वाटा उचलला. त्यांच्या निधनानंतर पक्षाचा आदेश मानून त्यांच्याच पत्नीला पोटनिवडणुकीत निवडून आणले. तसेच, 2017 च्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत रहाटणी प्रभागात पॅनल प्रमुख म्हणुन स्वतःच्या खां‌द्यावर जबाबदारी घेऊन भारतीय जनता पार्टीचे माझ्यासह 4 उमेदवारांना बहुमताने निवडून आणले.पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीची सता आली. सत्तेच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात जगताप कुटुंबियांनी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील एकही पद मिळू दिले नाही. महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, पक्षनेता या मानाच्या पदासाठी इच्छुक असताना देखील मी पंधरा वर्षे नगरसेवक असून सुद्धा मला डावलून नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना संधी देण्यात आली. पक्षाशी एकनिष्ठ राहूनसुद्धा पक्षाकडून माझ्यावर अन्याय झाला. तशी वरिष्ठांना पूर्वकल्पना दिली होती. त्यामुळे वरीष्ठांकडून कधीना कधी नक्कीच न्याय मिळेल, यावर विश्वास ठेऊन पक्षाचे इमानेइतबारे काम करत राहिलो. 2024 लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारास बहुमत मिळवून दिले. आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून चिंचवड मतदार संघाची उमेदवारी मागितली. तरीही पक्षाकडून मला डावलून घराणेशाहीलाच प्राधान्य देत त्यांनाच उमेदवारी देण्यात आली. जगताप कुटुंबीयावर मतदार संघामध्ये प्रचंड नाराजी आहे. एवढी नाराजी असताना शिवाय त्यांच्याकडे शहराध्यक्ष पद असताना देखील त्यांनाच उमेदवारी दिली. स्व. लक्ष्मण जगताप यांना दोनवेळा, त्यांच्या निधनानंतर पत्नींना उमेदवारी दिली. त्यावेळी आम्ही आक्षेप घेतला नाही. आता पुन्हा त्यांच्याच घरातील सदस्याला उमेदवारी दिली. पक्षाकडे माझ्यासारखा सक्षम चेहरा असताना त्याच कुटुंबामध्ये उमेदवारी दिली. त्यांनी शहराध्यक्ष म्हणुन पक्षाच्या नियमाप्रमाणे कोणत्याही पदाधिकाऱ्यांना नियमितपणे बैठकीचे निमंत्रण दिले नाही, आम्हाला डावलून पक्षाचे कार्यक्रम घेतले. त्यांना पक्षाकडून दिलेली उमेदवारी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पटलेली नाही. चिंचवड विधानसभेमध्ये भा.ज.प. संघटन न टिकवता पक्षांतर्गत हुकुमशाही चालु आहे, म्हणुन मी या त्रासाला कंटाळून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य व प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे, असे या पत्रात चंद्रकांत नखाते यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
18.1 ° C
18.1 °
18.1 °
63 %
1kmh
0 %
Sun
22 °
Mon
27 °
Tue
28 °
Wed
27 °
Thu
26 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!