चिंचवड -येथील योगदान प्रतिष्ठान व नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांच्यावतीने दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ झाला. कार्यक्रमाचे यंदाचे 19 वे वर्ष असून गेले 19 वर्षे सुरेश शिवाजी भोईर मार्फत विद्यार्थ्यांना सन्मानीत करून कौतुक करण्यात येते. यंदाच्या 275 विद्यार्थी यांना गौरवण्यात आले व त्यांना विवेक वेलणकर यांचे दहावीनंतर शाखा निवड हे पुस्तक व गिफ्ट देऊन सन्मानीत करण्यात आले.
ह्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ह. भ. प. किसन महाराज चौधरी , भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष शंकरशेठ जगताप, नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर उपस्थित होते. विद्यार्थी यांना बहुमोल मार्गदर्शन व पुढील वाटचालीस शुभेच्छा शंकर शेठ जगताप यांनी दिल्या तसेच मुलांना मोफत उच्चतंत्र शिक्षण योजनेचे लाभ घ्यावा असे आव्हान केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयकुमार बोरसे यांनी तर प्रस्ताविक सुरेश भोईर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित ह. भ.प. मधुकर महाराज मोरे भाजपा उपाध्यक्ष रवींद्र देशपांडे, चाफेकर स्मारक समिती सदस्य गतिराम भोईर महिला मोर्च्या भाजपा उपाध्यक्ष दिपाली कलापुरे ह्या सह विद्यार्थी, पालक व जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार गतिराम भोईर यांनी मानले.