33.1 C
New Delhi
Sunday, March 23, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात ’मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ सुरु

राज्यात ’मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ सुरु

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय


मुंबई – राज्यात ’मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ सुरु करणार असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. विधानसभेत बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. याबाबतची मागणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती. प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधीद्वारे तिर्थदर्शन लक्षवेधी केली होती. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र संताची भुमी आहे. पांडुरंगाची वारी (pandharichi wari)सुरु आहे. आपण पहिल्यांदाच २० हजार रुपये दिंडीला अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.


मुख्यमंत्री(chief minister) तीर्थदर्शन योजना याबाबात नियम ठरवू असे मुख्यमंत्री म्हणाले. दरवर्षी नियमावली करुन आपण किती लोकांना पाठवू शकतो हे ठरवू. बाय रोटेशनप्रमाणे ही योजना सुलभपणे राबवू असे मुख्यमंत्री म्हणाले. काही जणांची इच्छा असते पण ते लोक जाऊ शकत नाहीत. अशा ज्येष्ठांना नागरिकांनासाठी ही योजना लागू करु असे मुख्यमंत्री म्हणाले. या योजनेचा आशिर्वाद सरकारला मिळेल. आम्ही नवीन नवीन निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले. लाडकी बहिण योजना आपण सुरु केली आहे. तर काही लोक म्हणाले की आरे लाडका भाऊ कुठे गेला. तर आम्ही लाडक्या भावाचा देखील निर्णय घेतल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
33.1 ° C
33.1 °
33.1 °
16 %
2.6kmh
0 %
Sun
33 °
Mon
37 °
Tue
39 °
Wed
39 °
Thu
37 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!