10.1 C
New Delhi
Tuesday, January 14, 2025
Homeमहाराष्ट्रराज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

मनसेचे सचिन चिखले यांची माहिती

पिंपरी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिली आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सदैव महाराष्ट्राच्या विकासासाठी आग्रही असणाऱ्या महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्याचा म्हणजेच हिंदू जननायक श्री राज साहेब ठाकरे यांचा जन्मदिवस मोठा उत्साहाने पार पाडला जात आहे. याच धरतीवर पिंपरी चिंचवड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संपूर्ण शहरभर विविध कार्यक्रमांचे, विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

१) मनसेचे चिंचवड विधानसभेचे विभाग अध्यक्ष मयूर चिंचवडे व मनसे उपशराध्यक्ष बाळा दानवले यांच्यावतीने संत मोनीबाबा अनाथ आश्रम, बिजलीनगर चिंचवड या ठिकाणी उद्या दुपारी १२:०० वाजता गरजूंना फळे वाटप व त्यांच्या हातून केक कापण्याचा कार्यक्रम करण्यात येणार आहे.२) मनसेचे भोसरी विधानसभेचे उपविभाग अध्यक्ष मयूर जयसिंग भाट यांच्यावतीने श्री दादा महाराज नाटेकर मोरया ट्रस्ट वृद्धाश्रम, छत्रालय, चिखली या ठिकाणी उद्या दुपारी ०२:०० वाजता गरजूंना फळे वाटप व त्यांच्या हातून केक कापण्याचा कार्यक्रम करण्यात येणार आहे.३) श्री राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी चिंचवडच्या वतीने वाय.सी.एम रुग्णालय, पिंपरी येथे ऍडमिट असणाऱ्या रुग्णांना येत्या शुक्रवारी ( दि.१४ जून २०२४ रोजी) दुपारी ०३:०० वाजता फळे वाटपाचा कार्यक्रम करण्यात येणार आहे. ४) तसेच, श्री राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरांमधील विविध प्रभागांमध्ये महिनाभराच्या कालावधीत तब्बल १००० देशी झाडे लावण्यात येणार आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
fog
10.1 ° C
10.1 °
10.1 °
100 %
2.6kmh
100 %
Tue
22 °
Wed
22 °
Thu
19 °
Fri
22 °
Sat
20 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!