16.6 C
New Delhi
Wednesday, February 5, 2025
Homeमहाराष्ट्रराष्ट्रीय एकतेचे बीज पेरण्यासाठी देशात प्रथमच११ गणेश मंडळांच्या संयुक्त मिरवणुकीचा नवा पायंडा

राष्ट्रीय एकतेचे बीज पेरण्यासाठी देशात प्रथमच११ गणेश मंडळांच्या संयुक्त मिरवणुकीचा नवा पायंडा

आदिवासी परंपरेचे सांस्कृतिक दर्शन घडविण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन

पुणे: प्रत्येकाच्या मना मनात राष्ट्र भक्ती व राष्ट्रीय एकतेचे बीज पेरण्याचा महत्त्वाचा धागा पकडून धनकवडी येथील ११ गणेश मंडळांनी एकत्रित येऊन देशातील सर्वात मोठी एकत्रित सार्वजनिक मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक युनिव्हर्सल ट्रायबल विकास संस्था यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या रथावर म्हणजेच ज्यात ११ गणेश मंडळांचे गणपती विराजमान करून भव्य मिरवणूक काढण्यात येईल. तसेच राज्यातील आदिवासी परंपरेची सांस्कृतिक दर्शन घडविण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष संतोष धनवकडे, अभिषेक तापकीर, उदय जगताप, विजय क्षिरसागर, सुनिल पिसाळ व विश्वस्त अनिरूद्ध येवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहरातील अन्य गणेश मंडळांनीही एकत्रित येऊन नवा पायंडा घालण्यासाठी हा उपक्रम आहे. त्यामुळे अशी चळवळ पुढे चालण्याचे आवाहन या परिषदेत करण्यात आले.


एकत्रित सार्वजनिक मिरवणूकीत धनकवडी येथील साईनाथ मित्र मंडळ, श्री शिव छत्रपती मित्र मंडळ, आदर्श मित्र मंडळ, फाईव्ह स्टार मित्र मंडळ, केशव मित्र मंडळ, जय महाराष्ट्र मंडळ, अखिल नरवीर तानाजी नगर मित्र मंडळ , एकता मित्र मंडळ, विद्यानगरी मित्र मंडळ, रामकृष्ण मित्र मंडळ, आणि अखिल मोहन नगर मित्र मंडळ यांच्या सारख्या ११ गणेश मंडळांनी मोठ्या संख्येने एकत्रित येऊन देशातील सर्वात मोठ्या एकत्रित मिरवणूकीचे आयोजन शनिवार दि. ७ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते सायं. ४ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. या मध्ये जवळपास ८ ते १० हजार नागरिक सहभागी होणार आहेत. ही मिरवणूक गुलाबनगर, धनकवडी येथून सुरू होऊन धनकवडी गाव, केशव कॉम्प्लेक्स, विद्यानगरी शिवशंकर चौक ते मोहनगर येथे काढण्यात येत आहे. या मध्ये ज्ञानप्रबोधिनी पथक आणि गोविंदा बँड पथक असणार आहे.
मिरवणूकीच्या प्रारंभी पालघर आणि गडचिरोली येथील आदिवासी परंपरेचे झलक असलेल्या रथावर ११ गणेश मंडळी विराजमान होतील. यावेळी आदिवासी नृत्य, त्यांची संस्कृती, परंपरा ,राहणीमान याचे दर्शन पुणेकरांना होईल असे युनिव्हर्सल ट्रायबल संस्थेच्या रजत राघहतवान यांनी सांगितले. त्याचप्रमाणे सर्व मंडळांच्या सहयोगाने संपूर्ण वर्षभर समाजउपयोगी कार्यक्रम चालविले जाणार आहेत. त्यामुळे या कार्यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा. गेल्या वर्षी धनकवडी मध्ये ११ गणेश मंडळांनी एकत्रित येऊन मिरवणूकीचा उपक्रम यशस्वीपणे पार पाडला होता. या वर्षी याच कार्याची रेघ पुढे ओढत ११ गणेश मंडळांनी सहभाग घेऊन ही मिरवणूक यशस्वीपणे पुर्ण करण्याचा संकल्प घेतला आहे.
या परिषदेत प्रतिक कुंभार, प्रवीण अनपट, चिन्मय वाघोलीकर, अनिकेत तावरे, उदय भोसले, आनंद शिंदे, रूपेश रनावरे, अभिजित कोळपे, अजिंक्य इंगळे, सोमनाथ शिर्के, आदित्य झाड, समीर दिघे, रोहित पोळ, योगेश घावरे, मिलिंद काळे व अन्य मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
16.6 ° C
16.6 °
16.6 °
42 %
3.7kmh
0 %
Wed
23 °
Thu
24 °
Fri
24 °
Sat
26 °
Sun
28 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!