निगडी :- भोसरी विधानसभेचे दमदार आमदार महेशदादा लांडगे यांच्या झंझावाती विकासकामांमुळे येथील मतदार समाधानी आहेत. त्यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी महत्वाची विकासकामे मार्गी लावले आहेत. त्यामुळे भोसरीसह निगडी प्रभाग क्रमांक १३ आणि समाविष्ट गावांचा मोठा विकास झाला आहे. मोठमोठे प्रकल्प या मतदार संघात त्यांच्यामुळेच आले. काही पूर्ण झाले तर, काही प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे भोसरी मतदारसंघाचा खरोखरच चेहरामोहरा बदलून गेला आहे. त्यामुळे ते सलग तिसऱ्यांदा लाखोंच्या मताधिक्क्याने भोसरी विधानसभेचे आमदार होतील, असा आशावाद शहर भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.
पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, शांत, संयमी आणि ‘पॉलिटिक्स विथ रिस्पेक्ट’ या संकल्पनेला अनुसरून गेली दहा वर्षे भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश दादा लांडगे हे केवळ विकासाचे राजकारण करीत आले आहेत. त्यांच्या कार्यकाळात निगडी प्रभाग १३ चा कायापालट झाला आहे. २०१७ मध्ये मी पिंपरी चिंचवड महापालिकेची प्रभाग क्रमांक १३ मधून निवडणूक लढविली होती. त्यावेळी मी ‘पॅनल’ प्रमुख होतो. आ. महेशदादांच्या नेतृत्वाखाली हि निवडणूक मी लढवली होती. मी स्वतः उच्चशिक्षित आणि आयटी इंजीनिअर आहे. आ. महेशदादांशी त्यामुळे निकटचा संबंध आला. त्यांची काम करण्याची अनोखी पद्धत आणि त्यात स्वतःला झोकून देण्याचा शिरस्त खरोखरच वाखाणण्याजोगा आहे.
त्यांच्या कार्यकाळात आज भोसरी मतदार संघात आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल, कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प, मोठे रुग्णालय, अभियांत्रिकी विद्यालय, संविधान भवन यासारखे अनेक विकासकामे मार्गी लागले आहेत. अजूनही काम करण्यास मतदार संघात मोठा वाव आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत देखील भोसरी मतदारसंघातील मतदारांनी आ. महेशदादा लांडगे यांचे हात बळकट करून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी मतरुपी भरभरून आशीर्वाद द्यावा, असं आवाहन दीपक मोढवे पाटील यांनी केले आहे.