7.1 C
New Delhi
Friday, January 16, 2026
Homeमहाराष्ट्रवाहतूक पोलिसांची विशेष मोहीम

वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवली असून १४ दिवसांमध्ये ५२ हजार १८९ दंडात्मक कारवाया करण्यात आल्या. या मोहिमेत जवळचे भाडे नाकारल्याप्रकरणी सुमारे ३२ हजार ई-चालान जारी करण्यात आले आहेत. त्या सर्व वाहनांचे परवाने निलंबीत करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात करण्यात आल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. रेल्वे स्थानक, मॉल, बस स्थानक व इतर ठिकाणी रिक्षाचालक लांबपल्ल्याचे भाडे मिळविण्यासाठी नजिकचे भाडे नाकारत असल्याची तक्रार वाहतूक पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या आधारे ८ ते २२ एप्रिल या कालावधीत वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली. या मोहिमेत एकूण ५२ हजार १८९ विविध कारवाया करण्यात आल्या. भाडे नाकारल्याप्रकरणी ३२ हजार ६५८ कारवाया, तर विनागणवेश रिक्षा चालवल्याप्रकरणी पाच हजार २६८ कारवाया करण्यात आल्या. क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतूक केल्याप्रकरणी आठ हजार ६५० व इतर प्रकरणात पाच हजार ६१३ कारवाया करण्यात आल्या. या सर्व कारवायांमध्ये ५२ हजार १८९ ई – चलन जारी करण्यात आले. विशेष म्हणजे भाडे नाकारल्याबद्दल कारवाई करण्यात आलेल्या सर्व ३२ हजार ६५८ वाहनांचे परवाने निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
7.1 ° C
7.1 °
7.1 °
93 %
1.5kmh
21 %
Fri
22 °
Sat
24 °
Sun
24 °
Mon
25 °
Tue
23 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!