9.1 C
New Delhi
Friday, January 3, 2025
Homeमहाराष्ट्रश्री देवी चतुःशृंगी मंदिर ट्रस्टअसा असेल या वर्षीचा नवरात्रौत्सव 2024

श्री देवी चतुःशृंगी मंदिर ट्रस्टअसा असेल या वर्षीचा नवरात्रौत्सव 2024

1 ) नवरात्र उत्सव दि. 03 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर 2024
2 ) नवरात्र उत्सवामध्ये मंदिर भाविकांसाठी 24 तास उघडे राहिल
3 ) घटस्थापना गुरूवार दि. 03/10/24 सकाळी 9.00 वाजता यावेळेस होईल.
4 ) श्री देवेंद्र देवदत्त अनगळ मंदिर व्यवस्थापक विश्वस्त यांच्या हस्ते घटस्थापना व नवचंडी होम 5 ) पौरोहित्य श्री श्रीराम नारायण कानडे गुरूजी.
6 ) अभिषेक, रूद्राभिषेक, महापूजा, महावस्त्र अर्पण करण्यात येईल.
7 ) दररोज सकाळी 10 व रात्री 9 वा. महाआरती करण्यात येईल. त्या दोन्ही वेळेस 10/10 लोकांतर्फे शंखनाद करण्यात येईल.
8 ) गणपती मंदिरात दररोज भजन, किर्तन, प्रवचन होईल. तसेच मंदिर परिसरात सुयोग मित्र मंडळाच्या वतीने निवारा वृद्धाश्रमातील आजींसाठी एक दिवस आजीबाईचा भोंडलाही आयोजित केला आहे. श्रीसुक्त, ललितासहस्त्रनाम, महिषासुर मर्दिनी स्त्रोत्र व वेदपठण यावेळेस मुख्य देवीच्या मंदिरात करण्याची योजना आहे.
9 ) दस – याच्या दिवशी शनिवार दि. 12/10/24 रोजी सकाळी 8.30 वाजता नवचंडी होम होणार आहे
10 ) दस – याच्या दिवशी शनिवार दि. 12/10 / 23 सायं. 5 पासून सिमोल्लंघनाची पालखी मंदिरापासून बँड, ढोल, लेझीम, नगारा, चौघडा, भुत्ये, वाघ्या मुरळीसह, देवीच्या सेवेक – यांचा सहभाग. हेलिकॉप्टरमधून देवीच्या पालखीवर पुष्पवृष्टी. यंदा पालखीच्या मिरवणुकीत कलावंत हे ढोल ताशाचे पथक हे प्रमुख आकर्षण राहणार आहे. मराठी सिनेसृष्टितील कलावंताचे हे पथक आहे. तसेच 25 लोक शंखनाद करणार आहे.
11 ) मंदिराच्या जिर्णोध्दाराचे काम सुरू झाले असुन साधारणपणे 40 % बांधकाम पुर्णत्वास आले आहे. उर्वरित बांधकाम व परिसराचे सुशोभिकरण पुढील 6 ते 8 महिन्यात पुर्ण करण्याचा संस्थेचा मानस आहे. मुख्य मंदिरातील सभामंडपाचे काम पुर्ण झाले नसले तरी भाविकांना देवीचे व्यवस्थित दर्शन घेता येईल. तसेच नविन सभामंडप पुर्वीच्या सभामंडपापेक्षा दुपटीने मोठा झाला असुन सभामंडपात प्रवेश केल्याबरोबर भाविकांना देवीचे दर्शन होईल.
12 ) एक भाविक देवीला सोने व मोत्याची नथ नवरात्र उत्सवात अर्पण करणार असुन त्याचीअंदाजे किंमत 3 लाख रू. आहे.
13 ) पुजा साहित्य, लहान मुलांची खेळणी, कपडे, महिलांसाठी दागिने कपडे, गृहपयोगी वस्तु, फोटो, मसाले, खाण्यापिण्याचे पदार्थ यांच्या स्टॉलची रेलचेल
14 ) भाविकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक, स्वयंसेवक, पोलिसदल, निमलष्करी दल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच संपुर्ण मंदिर परिसरात जागोजागी सीसी टिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
15 ) आपत्ती व्यवस्थापन सहाय्यासाठी अनिरूध्द सेवा केंद्राचे ( डीएमव्ही ) डिझास्टर मॅनेजमेंट वॉलेंटियर 150 स्वयंसेवक तैनात केले आहेत.
16 ) भाविकांच्या आरोग्यासाठी संपुर्ण परिसरात जंतुनाशके तसेच किटकनाशकांची फवारणी करण्यात आली आहे.
17 ) ग्रीन हिल्स ग्रुपच्या सहकार्याने देवस्थान ट्रस्टने देवळामागील डोंगरावर 12000 रोपे लावली असुन त्यांची उत्कृष्टरीत्या जोपासना केली आहे. त्यास लागणा – या खताची निर्मीती देवीला वाहिलेल्या फुलांच्या निर्माल्यापासुन करण्यात येते.
18 ) अग्निशामक दलाची गाडी ( घटस्थापना ते दस – यापर्यंत ) मंदिर परिसरात ठेवण्यात आली आहे. 19 ) युवराज तेली मेमोरीअल ट्रस्टतर्फे भाविकांसाठी cardiac ambulance ची सोय करण्यात आली आहे. तसेच 24 तास 2 डॉक्टर व सपोर्ट स्टाफ असा 9 जणांचा ग्रुप भाविकांच्या सेवेला असणार आहेत. वैद्यकीय अत्यावश्यकता पडल्यास औषधोपचार मोफत दिले जाणार आहेत. 20 ) पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या मैदानावर विनामूल्य पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. 21 ) भाविकांना देवीचे सुलभ दर्शन व्हावे यासाठी संपुर्ण बॅरिकेटींग सह रांगांची व्यवस्था करण्यात आली आहे.
22 ) मंदिर व परिसरात सुशोभिकरण करण्यात आले आहे.
23 ) मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच 24 तास जनरेटरची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
24 ) सर्व भाविकांचा यात्रेसह संपूर्ण वर्षाचा रूपये दोन कोटीचा विमा करण्यात आला आहे. कोणतीही दुर्घटना घडल्यास दुर्घटनाग्रस्त भाविकांना विम्याचे कवच देण्यात आले आहे. 25 ) देवस्थान ट्रस्टनी भाविकांसाठी ऑनलाईन दर्शन पासची व्यवस्था केलेली आहे. तसेच मंदिर परिसरात देखील ऑफलाईन दर्शन पासेस वितरणासाठी तीन काऊंटरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ऑनलाईन दर्शन पाससाठी www.chatushrungidevi.com या वेबसाईटवर भाविकांना ऑनलाईन पास मिळु शकतील.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
fog
9.1 ° C
9.1 °
9.1 °
100 %
0kmh
20 %
Thu
16 °
Fri
24 °
Sat
26 °
Sun
26 °
Mon
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!