पंढरपूर :- श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे vithal mandir samitee समितीस मंगला मारूती पाटील राहणार ठाणे यांनी 2 लाख 51 हजार रूपयांची देणगी धनादेश स्वरूपात दिल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.सदरची देणगी देणगीदार यांचे पती मारूती पाटील यांनी आज श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात उपस्थित राहून दिली आहे. त्याबद्दल देणगीदार भाविकांस श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन मंदिर समितीचे लेखा अधिकारी मुकेश अनेचा यांनी सन्मान केला. पाटील कुटुंब हे श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे निस्सिम भक्त आहेत. मंगला पाटील यांची श्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या vithal rukamaniचरणी देणगी अर्पण करण्याची इच्छा होती. परंतू त्यांना काही कारणास्तव उपस्थित राहता आले नाही. मात्र, त्यांनी श्रींच्या चरणी देणगी अर्पण करून आपली इच्छा पूर्ण केली आहे. तसेच श्री विठ्ठल मंदिर बघवाडा, गुजरात यांचेकडून देखील ऑनलाईन पध्दतीने 1 लक्ष रूपयांची देणगी प्राप्त झाली आहे.
सद्यस्थितीत, माघ यात्रेचा कालावधी सुरू झाला आहे. त्यामुळे भाविकांकडून देणगी प्राप्त करून घेण्यासाठी स्वयंसेवी संस्थेची मदत घेण्यात येणार असून, जादा स्टॉल उभारण्यात करण्यात येत आहे. याशिवाय, ऑनलाईन देणगीसाठी आरटीजीएस, क्यूआर कोड, संकेतस्थळ व मोबाईल ॲपची देखील सुविधा आहे. इच्छुक भाविकांना देणगी द्यावयाची असल्यास, त्यांनी श्री संत तुकाराम भवन येथील देणगी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने यावेळी श्री श्रोत्री यांनी केले.