टाळ मृदंगाच्या गजरात, ग्यानबा तुकारामाचा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात वेगाने धावणारे अश्व अशा नयनरम्य वातावरणात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील अश्र्वाचे पहिले गोल रिंगण बेलवाडी(ता. इंदापूर) येथे उत्साहात पार पडले. याचि देही, याचि डोळा! असा हा नयनरम्य रिंगण सोहळा वैष्णवांसह भाविकांनी अनुभवला.
सणसर मुक्कामानंतर संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बेलवाडीच्या दिशेने मार्गस्थ झाला. जाचक वस्ती ग्रामपंचायतच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी या पालखी सोहळ्याचे स्वागत केले. यांनतर बेलवाडी मध्ये पालखी सोहळा दाखल होताच मोठ्या उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले. साडेआठ वाजता ज्ञानोबा-तुकारामाच्या जयघोषात सुरुवातीला नगारखाना नंतर सर्व दिंड्या व पालखी सोहळा रिंगण स्थळामध्ये दाखल झाला. पालखी रिंगणामध्ये येत असताना मानवी मनोरा करून पालखीला सलामी देण्यात आली. यावर्षी हा प्रथमच उपक्रम राबवण्यात आला असून यामुळे रिंगणाची रंगत अधिक वाढली .सुरुवातीला मेंढ्यांचे रिंगण पार पडले, त्यानंतर भगव्या पताका घेतलेल्या वारकऱ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात धावत फेऱ्या पूर्ण केल्या. फुगडी खेळत आनंद घेतला.
संत योगीराज चांगवटेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे रावणगाव (ता.दौंड) येथील ग्रामस्थांनी मोठ्या भक्तिमय वातावरणात स्वागत केले रांधवण वस्ती येथील बकऱ्यांचे गोल रिंगण हे यावेळी आकर्षण राहिले
रविवारी दि.७ रोजी सायंकाळी पालखी सोहळा गावात प्रवेश करताच सालाबाद प्रमाणे माळवाले यांच्या शेतात अश्वाचे गोल रिंगण पार पाडले यानंतर पालखी सोहळा मोठ्या गाजावाजात गावात आल्यानंतर सायंकाळी भजन, कीर्तन व आरती घेण्यात आली.
यानंतर पालखी सोहळा दर्शनासाठी मारुती मंदिरात विसावला गेला ग्रामस्थांच्या वतीने भाजी भाकरीचे जेवन रात्रीच्या वेळेस वारकऱ्यांना देण्यात आले.सोमवार दि.८ रोजी सकाळी निलेश पोमणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वारकऱ्यांसाठी नाष्ट्याची सोय केली होती चांगवटेश्वर महाराज पालखी सोहळ्यात रावणगावकरांची दिंडी मागील काही वर्षापासून सहभागी होत असल्याने यासाठी ग्रामस्थ किरण बिडवे व बबन आटोळे यांनी मोठा पुढाकार घेत नियोजन केले. सोमवारी सकाळी पालखी सोहळा किर्तन व आरतीच्या कार्यक्रमा नंतर रांधवण वस्ती येथील भीमा – पाटस कारखान्याचे माजी संचालक लक्ष्मण रांधवण यांच्या घरी बकऱ्यांचे गोल रिंगण पार पडले यानंतर पालखी सोहळा पुणे – सोलापूर महामार्गाने पुढील मुक्कामी मार्गस्थ झाला.