16.1 C
New Delhi
Thursday, December 26, 2024
Homeमहाराष्ट्रसांगवीकरांचं  ठरलंय; चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगतापच !

सांगवीकरांचं  ठरलंय; चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगतापच !

प्रचंड उत्साह, विश्वास, जोश आणि सांगवी करांच्या आशीर्वाद व प्रेमाने भारावून गेले शंकर जगताप !


– नवी सांगवीतील मतदार शंकर जगताप यांच्या पाठीशी

– आमचं मत चिंचवडच्या विकासालाच.. म्हणजेच शंकर जगतापांनाच !’

चिंचवड : –  नवी सांगवीमध्ये आज (गुरुवारी) झालेल्या भव्य प्रचार रॅलीदरम्यान चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांनी परिवारजनांशी संवाद साधला, आणि त्यांचे विजयासाठी आशीर्वाद घेतले. चिंचवड विधानसभा मतदार संघातील बंधू – भगिनी आणि सर्व सामान्य जनता ही कायम माझ्या हृदयात आहे. आणि त्यांचे स्थान कायम तसेच राहील. त्यांच्या या विश्वासामुळेच लढण्याची ताकत मला मिळाली आहे. त्यांनी प्रेमाने आणि उत्साहाने माझे स्वागत केले. संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदार संघात माय – बाप जनतेच्या खंबीरपणे पाठीशी उभा राहून मी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणार असल्याचे जगताप यांनी या वेळी सांगितले.

सकाळच्या सत्रात नवी सांगवी येथे निघालेल्या प्रचार रॅलीत  एम के चौक, समता नगर, गणेश नगर, कीर्ती नगर, समर्थ नगर, आदर्श नगर मधील चैत्रबन सोसायटी, सरस्वती पार्क या ठिकाणी नागरिकांशी भेटी गाठी घेत मतदारांशी घराघरात जाऊन संवाद साधला. माता- भगिनींकडून त्यांना औक्षण केले जात होते.

या प्रचार रॅलीमध्ये माजी नगरसेवक राजेंद्र राजापुरे, अंबरनाथ कांबळे, बळीराम जाधव, सांगवी – राहटणी मंडल उपाध्यक्ष कविता निखाडे, शीतल आगरखेड,  सूर्यकांत गोफणे, बाबुराव शितोळे, सखाराम रेडेकर, प्रशांत कडलक, बाळासाहेब पिल्लेवार, सुरेश तावरे, राजू पाटील, आप्पा पाटील, शामराव पालांडे, संदीप दरेकर, राजू मोरे, सुनील कोकाटे, गणेश बनकर, देविदास शेलार, उमेश झरेकर, सुरेश शिंदे, किशोर शिंदे, शिवशरण टेंगळे, बसवराज हिरेमठ, जयसिंग जाधव, अभय नरवडेकर, अमित घोडसाद, चंद्रकांत बेंडे, संजय मराठे, साई कोंढरे, लालासाहेब ढोरे, शिरीष कवडे, राजू नागणे, ज्ञानेश्वर खैरे, सचिन खराडे, विशाल खैरे, संभाजी भेगडे, गिरीश देवकाते, विक्रम भेगडे, मनीष भापकर, राजेश साळुंखे, पवन साळुंखे, प्रवीण जाधव, अशोक कवडे, अविनाश खुंटे, प्रवीण पाटील, योगेश कदम, ललित म्हसेकर, शैलेश जाधव, मनीष रेडेकर, विकी रेडेकर, विशाल गायकवाड, संतोष पाटील, रामदास पोखरकर, रवींद्र रासने, रविकुमार चौधरी, प्रवीण देवासे, संभाजी ढवळे, श्रीकांत पवार, शंकर ननावरे, गोविंद मुखणे, अमित कानडे, बोरसे सर, योगेश कदम यांच्यासह नवी सांगवीतील ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते तसेच महिला वर्ग, युवा वर्ग भाजप शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय मित्र पक्षातील आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

उमेदवार जगताप म्हणाले की, माझ्या याच परिवारामुळे चिंचवड विधानसभा मतदार संघात मला आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी प्राप्त होईल. स्व. लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या प्रेरणेने चिंचवड विधानसभेतून जास्तीत जास्त मतांनी विजय मिळेल आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि विकासपुरुष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना साथ देवून महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आपल्याला आणायचे आहे, असे उमेदवार जगताप म्हणाले.

————————————–

गेल्या 10 वर्षांत स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी मोठा हातभार लावला होता. शहरातील पाण्याचा प्रश्न. जीवघेण्या ट्रॅफिक समस्येवर तोडगा. शहरातील गावांना ‘स्मार्ट सिटी’ बनवलं. आमदार फंडातून चिंचवड विधानसभा मतदारसंघातील विविध भागात विकासात्मक कामे केली. तसेच अडीअडचणीत असलेल्या सर्वसामान्यांना मदतीचा हात दिला. विविध आरोग्य शिबिरे घेतली. महिलांच्या सक्षमीकरणाला चालना दिली. तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध क्रीडास्पर्धा आयोजित केल्या. ज्येष्ठ नागरिक कामे केली. आध्यात्मिक प्रवचनाचे आयोजन केले. विविध धार्मिक सण, उत्सव आयोजित करून सामाजिक एकोपा जपला. त्यांनी जनहितासाठी अनेक विकास कामे केली.  तरुणांचा रोजगाराचा प्रश्न मिटवला. या आणि अशा अनेक कामांमुळेच चिंचवड विधानसभा मतदारसंघांमध्ये स्व. लक्ष्मण भाऊ जगताप हे लोकप्रिय ठरले होते.

शंकर जगताप,
उमेवार, चिंचवड विधानसभा मतदारसंघ.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
16.1 ° C
16.1 °
16.1 °
67 %
0kmh
20 %
Thu
19 °
Fri
23 °
Sat
17 °
Sun
21 °
Mon
22 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!