कर्जत- कोरोनाच्या संकटकाळात घरातून बाहेर न पडता ‘फेसबुक लाईव्ह’ करण्यातच धन्यता मानणाऱ्यांना कायमचे घरी बसवा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी केले. सत्तेसाठी शरद पवार यांच्या मांडीवर जाऊन बसणारे उद्धव ठाकरे हे आधुनिक महाभारतातील दुर्योधनच आहेत, अशी टीका देखील त्यांनी केली.मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता महामेळाव्यात ते बोलत होते.त्यावेळी मनसेचे नेते अमेय खोपकर, दिलीप बापू धोत्रे, आमदार महेंद्र थोरवे, रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा उपाध्यक्ष सचिन करणुक, कर्जत तालुका अध्यक्ष महेंद्र निगुडकर, खालापूर तालुकाध्यक्ष विजय सावंत, पनवेल तालुकाध्यक्ष रामदास पाटील, जिल्हा सचिव अक्षय महाले, जे पी पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सपना राऊत यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.संदीप देशपांडे म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना आमदार सांभाळता आले नाहीत. त्यामुळे त्यांना सहानुभूती दाखविण्याचे काहीही कारण नाही. मनसेचे नगरसेवक फोडणाऱ्या उद्धव ठाकरे यांना त्यांच्या आमदारांनी साथ सोडली तेव्हा वाईट वाटायचे काहीच कारण नाही.सत्तेच्या लालसेपोटी पवारांच्या मांडीवर जाऊन बसलेले आधुनिक महाभारतातील ते दुर्योधन आहेत. संजोग वाघेरे हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. राष्ट्रवादीची पोर सांभाळायला उद्धव ठाकरे यांनी पक्ष काढला आहे का, असा सवाल त्यांनी केला.
हुकूमशाही तर उद्धव ठाकरे यांनी केली
कोरोना काळात फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना कायमचे घरी बसवा - संदीप देशपांडे
RELATED ARTICLES
New Delhi
clear sky
34.2
°
C
34.2
°
34.2
°
10 %
2.2kmh
0 %
Thu
41
°
Fri
42
°
Sat
41
°
Sun
42
°
Mon
41
°