पुणे : ‘एमआयटी स्कुल ऑफ गव्हर्नमेंट’ अंतर्गत स्थापित ‘राष्ट्रीय सरपंच संसद’ आणि’महाराष्ट्र शासन – सामाजिक वनीकरण विभाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यात ‘वृक्षारोपण महायज्ञ’ उपक्रमाअंतर्गत मंगळवार,दि.3 सप्टेंबर 24 रोजी भामचंद्रनगर (ता.खेड, जि.पुणे) येथे जिल्हास्तरीय वृक्षरोपे वितरण व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘वृक्षारोपण महायज्ञ’ उपक्रमांतर्गत ‘राष्ट्रीय सरपंच संसदे’चे सदस्य असणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या 34 ग्रामीण जिल्ह्याच्या 351तालुक्यातील 3400 ग्रामपंचायत गावात 34 लक्ष वृक्षरोपांची लोकसहभागातून लागवड करण्यात येत आहे.
‘एमआयटी,पुणे’ शिक्षणसंस्थासमूहाचे कार्याध्यक्ष, श्री.राहुल कराड यांची ही संकल्पना असून ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे वनमंत्री मा.श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार हे या उपक्रमाचे मार्गदर्शक आहेत. अशी माहिती राष्ट्रीय सरपंच संसदेचे कार्याध्यक्ष श्री.योगेशजी पाटील, उपाध्यक्ष श्री.प्रकाशराव महाले यांनी दिली.
‘वृक्षारोपण महायज्ञ’ उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्याच्या 13 तालुक्यातून ‘राष्ट्रीय सरपंच संसदे’शी संलग्न असणाऱ्या 130 ग्रामांची निवड करण्यात आली असून या गावात प्रत्येकी 1000 वृक्षरोपे वितरित करण्यात येतील.सरपंच त्या रोपांची लागवड आपापल्या गावात लोकसहभागातून सार्वजनिक ठिकाणी करतील.
पुणे जिल्ह्यातील 130 सरपंचांना वृक्षरोपे वितरित करण्याचा कार्यक्रम पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील भामचंद्रगड (वासुली फाटा)येथील जामखाना सभामंडपात आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 11 वाजता या कार्यक्रमास सुरुवात होईल.
ज्येष्ठ सहकारतज्ञ व महाराष्ट्र राज्याचे निवृत्त साखर संचालक श्री.सुनिलजी पवार हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत.ज्येष्ठ सहकार तज्ञ व निवृत्त साखर संचालक श्री.सुनीलजी पवार कार्यक्रमाचे उदघाटक व प्रमुख अतिथी आहेत. सामाजिक वनीकरण विभागाचे पुणे विभाग मुख्य वनाधिकारी श्री.आशिषजी ठाकरे कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत.खेड तालुक्याच्या तहसीलदार सौ.ज्योतीताई भांगरे व खेडचे गट विकास अधिकारी श्री.विशालजी शिंदे हे विशेष निमंत्रित अतिथी आहेत.
सामाजिक वनीकरण विभागाच्या पुणे जिल्हा विभागीय वन अधिकारी श्रीमती आशाजी भोंग, राष्ट्रीय सरपंच संसदेच्या कोकण विभाग महिला समन्वयक डॉ. भावनाताई थोरात, पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. कालिदासजी वाडेकर, पुणे जिल्हा समन्वयक श्री.भूषणजी ताकवले,पुणे जिल्हा महिला समन्वयक डॉ. वर्षाताई शिवले, पुणे जिल्हा संघटक श्री.सोमनाथजी शिंदे, पुणे जिल्हा महिला संघटक सौ.उज्ज्वलाताई शेवाळे, सहाय्यक वनसंरक्षक सौ.जयश्रीताई जगताप, सहाय्यक वनसंरक्षक श्री.अनिलजी लांडगे यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम होईल.
राष्ट्रीय सरपंच संसदेच्या पुणे जिल्हा महिला संघटक, सामाजिक कार्यकर्त्या सौ. रत्नाताई पिंगळे कार्यक्रमाच्या प्रमुख संयोजक आहेत.
राष्ट्रीय सरपंच संसदेचे खेड तालुका अध्यक्ष श्री.सचिन नाईकडे,तालुका समन्वयक श्री.अक्षय शिवेकर,तालुका संघटक श्री.दीपक कालेकर, तालुका महिला समन्वयक सौ.सुनिताताई शिवेकर, तालुका महिला संघटक सौ.योगिनीताई जगनाडे, तालुका महिला सह समन्वयक सौ.निकिताताई गावडे व तालुका महिला सहसंघटक सौ.ज्योतीताई कडलग हे कार्यक्रमाचे संयोजक आहेत.
प्रमुख अतिथिंच्या हस्ते सरपंचांना वृक्षरोपे पत्र वितरित करण्यात येतील. त्यानंतर प्रमुख अतिथी, संयोजक व पुणे जिल्ह्यातील 130 सरपंच भामचंद्रनगर येथे सामुदायिक वृक्षारोपण करतील.