29.1 C
New Delhi
Friday, September 19, 2025
Homeमहाराष्ट्रपंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच पुणे दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच पुणे दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच पुणे दौऱ्यावर

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पुणे दौऱ्यावर येणार आहेत त्यांच्या हा दोरा आगामी निवडणुकीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.पुण्यातील स्वारगेट ते सिव्हील कोर्ट या भूमिगत मेट्रो मार्गाच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त ठरला आहे. त्याचबरोबर नुकतीच केंद्राची मान्यता मिळालेल्या स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाचे भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दि.२७ सप्टेंबरला पुणे दौऱ्यावर येत आहेत. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे. तसेच सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर पंतप्रधान मोदी यांची सभा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासंदर्भात मुख्य सचिवांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विभागीय आयुक्तांची बैठक घेतली. त्या बैठकीत दौऱ्यातील कार्यक्रमांचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची गुरुवारी विभागीय आयुक्तालयात प्राथमिक बैठक घेतली. त्या बैठकीत मोदींच्या दौऱ्याच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. बैठकीची अंतिम फेरीसुद्धा होणार असून त्यानंतर कार्यक्रमाच्या नियोजनावर शिक्कामोर्तब केला जाणार आहे.

मेट्रोच्या उद्घाटन आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर सभा घेण्यासाठी पुण्यात स. प. महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय, कृषी महाविद्यालयासह आणखी एका जागेची चाचपणी प्रशासनाकडून सुरू आहे. त्यापैकी मेट्रो मार्गाचे उद्घाटन तसेच भूमिपूजन हे मध्यवस्तीतील रहिवाशांसाठी फायदेशीर आहे. तसेच शहरातील वाहतूक कोंडी पाहता जवळचा मार्ग म्हणून स. प. महाविद्यालयाचे मैदान ही सभेसाठी निश्चित करण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मोदी यांचा कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर सभेचे ठिकाण पुढील बैठकीत निश्चित होणार आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
29.1 ° C
29.1 °
29.1 °
84 %
1kmh
40 %
Thu
29 °
Fri
33 °
Sat
38 °
Sun
38 °
Mon
38 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!