14.1 C
New Delhi
Friday, December 12, 2025
Homeमहाराष्ट्रअरविंद एज्युकेशन सोसायटीमध्ये विद्यार्थ्यांनी जाणून घेतले योगाभ्यासाचे महत्त्व

अरविंद एज्युकेशन सोसायटीमध्ये विद्यार्थ्यांनी जाणून घेतले योगाभ्यासाचे महत्त्व

पिंपरी :- सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी स्कुल, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, मुख्याध्यापिका आशा घोरपडे, मुख्याध्यापिका नीलम पवार, प्राचार्य शीतल मोरे, मुख्याध्यापिका इशिता परमार, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, पर्यवेक्षिका प्रिती पाटील, पर्यवेक्षिका सीमा हवालदार, क्रीडा शिक्षिका सुषमा पवार, अक्षय नाईक, भटू शिंदे, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

ध्यानधारणेने योगा दिन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी सामुदायिक सूर्यनमस्कार, तसेच योगाचे विविध प्रकार, ताडासन, शीर्षासन आदी आसने करून दाखविली. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनीही सर्व योगासने व सूर्यनमस्कार केले. विद्यार्थिनींनी योगा डान्स करत विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढविण्यासाठी शिक्षिका प्रतिभा ओक यांनी प्रकाश प्रवहन हे ध्यानाचे तंत्र विद्यार्थ्यांकडून करून घेतले. विद्यार्थ्यांनी संगीतावर विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. विद्यार्थ्यांकडून एकाग्रता वाढविण्यासाठी प्रभावी ओंकार ध्यान करवून घेतले.

आरती राव म्हणाल्या, की आजच्या धकाधकीच्या युगात योग ही विद्यार्थी व शिक्षकांसाठी काळाची गरज आहे. योगमुळे नकारात्मक भावना, भिती, राग, नैराश्य, चिंता दूर होऊन स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. तुमचे मन शांत, शरीर तंदुरुस्त आणि आत्मा मजबूत बनवा. कारण आरोग्य ही सर्वात मोठी भेट आहे. प्रणव राव यांनी सांगितले, की योगासनाने एकाग्रता, स्मरणशक्ति, विचारांची स्पष्टता वाढते. आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे. या संपत्तीचे संवर्धन करण्यासाठी योगाची जोड अत्यावश्यक आहे, असा संदेश देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

मुख्याध्यापिका आशा घोरपडे, मुख्याध्यापिका नीलम पवार, इशिता परमार व प्राचार्या शीतल मोरे यांनी योग दिन सादर करण्यामागचा हेतू स्पष्ट करीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ज्योती मोरे, शिल्पा पालकर, तनुजा ववले, मयुरी भोसले, क्रीडा शिक्षक अक्षय नाईक, सोनिया गुरूंग, तृप्ती जगताप, संजीवनी बढे, दर्शना बारी, निकीता अडसूळे यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व विशद करीत योगसाधनेमुळे एकाग्रता वाढवण्यासाठी विविध पद्धती करून दाखवल्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
14.1 ° C
14.1 °
14.1 °
72 %
0kmh
0 %
Thu
19 °
Fri
25 °
Sat
25 °
Sun
25 °
Mon
27 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!