पुणे : ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्ताने दरवर्षी देण्यात येणारा ‘समाजभूषण पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांना जाहीर करण्यात आला आहे. सोबतच अर्थ विषयातील प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर रचना रानडे यांना युवा गौरव तर पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ,सांगली चे संचालक सिद्धार्थ गाडगीळ यांना उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
मनोज जोशी हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते असून ते रंगकर्मी देखील आहेत. मराठी आणि गुजराथी रंगभूमीवरील विविध नाटकांत त्यांनी भूमिका बजावल्या आहेत. गेल्या ३ दशकांहून अधिक काळ सुरु असणारे त्यांचे ‘चाणक्य’ हे नाटक देश विदेशात गाजले आहे. भारत सरकार ने त्यांच्या या कार्याची दाखल घेऊन त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. दत्त संप्रदायातील महत्वाचे क्षेत्र असणाऱ्या कर्नाटकातील श्री माणिकप्रभू महाराज संस्थान चे पीठाधीश ज्ञानराज माणिकप्रभू महाराज यांच्या हस्ते या सर्व पुरस्कारांचे वितरण होईल.हा कार्यक्रम रविवार ( दि. १२ ) रोजी सायं ६ वाजता टिळक स्मारक मंदिर येथे पार पडणार आहे. पुणेकरांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास हजेरी लावावी असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष पं. अतुलशास्त्री भगरे यांनी केले आहे..
मनोज जोशी यांना ‘समाजभूषण पुरस्कार’ जाहीर
ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे विविध पुरस्कारांची घोषणा
RELATED ARTICLES
New Delhi
clear sky
20.6
°
C
20.6
°
20.6
°
14 %
2.8kmh
0 %
Fri
29
°
Sat
29
°
Sun
29
°
Mon
29
°
Tue
29
°


