15.1 C
New Delhi
Monday, November 10, 2025
Homeमहाराष्ट्रज्ञानोबा-तुकोबांच्या  गजरात  "खेळ रंगला वारकर्‍यांचा’

ज्ञानोबा-तुकोबांच्या  गजरात  “खेळ रंगला वारकर्‍यांचा’


पुणे- ” पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’, ‘जय जय रामकृष्ण हरी’ यां सारख्या जयघोषणाने “खेळ रंगला वारकर्‍यांचा” ने वारकऱ्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली.  वारकरी परंपरेचे विविध पैलू असणाऱ्या रिंगण, फुगडी, काटवट कणा, कांदा फोडी, तळ्यात मळ्यात, हरिनामाच्या जयघोषात उड्या मारणे यासारख्या खेळात प्रत्येक वारकरी दंग झाला होता.
वारकरी परंपरेला आणि संस्कृतीला अभिवादन म्हणून महाराष्ट्रात प्रथमच मुळशी येथील युवानेते मिलिंद दादा वाळंज युवा मंचाच्यावतीने  ‘खेळ रंगला वारकर्‍यांचा’ या भक्तिमय कार्यक्रमाचे सनीज वर्ल्ड, सूस येथे आयोजन करण्यात आले होते.  येथे वारकऱ्यांनी आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा अनुभव घेतला. या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो वारकरी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदकुमार ( बाबूजी ) वाळंज हे होते. तसेच खासदार श्रीरंग बारणे , आमदार शंकर भाऊ मांडेकर, आमदार अतुल शेठ बेनके, सनी निम्हण, मुळशी येथील युवानेते व सामाजिक कार्यकर्ता मिलिंद वाळंज,  ह भ प पांडुरंग महाराज शास्त्री शितोळे, वारकरी सांप्रदाय समाज तालुका मुळशी दिंडी क्र. ९६ चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पहिल्या दहा जोडप्यांना म्हणजेच  रेणुका जोरी, नथाबाई दिनकर भरम, अंजना दत्तत्रय पळसकर, शंकर वाघू कंधारे, सुनंदा अंकुश शेडगे, लक्ष्मीबाई नारायण साठे, अशोक बाबूराव घोले, बबन बाबुराव वाळंज, बाळू संतोष हिलम ,अजय अशोक ओव्हाळ, मंगल पांडुरंग दाभाडे यांना  विमानाने काशी दर्शन घडविण्यात येईल.  याप्रसंगी अनेक वारकऱ्यांना बक्षीसे देण्यात आली. तसेच, सेवाधारी आशा वर्कर्सच्या नऊ दुर्गांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला
ह.भ.प. पांडुरंग महाराज शास्त्री म्हणाले, “अध्यात्म,  विज्ञान आणि राजकारण ज्यावेळी एकत्र येईल त्यावेळी भारत महासत्ता म्हणून उदयास येईल.  वारकरी संप्रदायातील तत्त्वज्ञान शांती प्रदान करणारे आहे.  यातील खेळ एकमेकांशी समन्वय साधत शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सुदृढ करणारे आहेत. या संप्रदायातील परंपरा जनतेला कळावी यासाठी खेळ रंगला वारकऱ्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मिलिंद वाळुंज म्हणाले” हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, असं सतत म्हणणारा तो वारकरी असतो.  जो वारीत जातो तो वारकरी असतो. पण विज्ञानालाही जे कळलं नाही आणि जो विनयशील आहे तो वारकरी आहे.  जो पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन आभार व्यक्त करतो तो वारकरी. वारकरी संप्रदायाची परंपरा हे आमच्या घराण्यात सुरुवातीपासूनच होती. यात बाबूजींनी वारकऱ्यांसाठी केलेल्या कार्याचा अखंड वसा मी पुढे नेईन.

हभप दशरथ महाराज वाहले म्हणाले, “विज्ञानाच्या युगात सर्व काही मिळालं पण सुख आणि समाधान नाही. या साठी वारकरी संप्रदायाची संगत आवश्यक आहे.  वारकरी संप्रदायाने एक विचार दिला, तसेच खेळाच्या माध्यमातून शरीर सुदृढ केले जाते. पहिला खेळ रिंगण, यामध्ये वारकरी उड्या मारतो नाचतो हरिनामाच्या जयघोषात हात वर खाली करतो त्यामुळे श्वसनाच्या क्रिया ह्या उत्तम होतात. फुगडी, काटवट कणा, कांदा फोडी असे वेगवेगळे खेळ खेळले जातात. हे खेळ समाज स्वास्थ्य बरोबरच मन सुदृढ ठेवते.


अतुल शेठ बेनके म्हणाले, ” वाळंज परिवारामध्ये आजही अखंडपणे वारकरी परंपरा सुरू आहे. नव्या पिढीला संस्कारक्षम करणे  खूप कठीण झाले आहे. अशा वेळेस वारकरी संप्रदायच हे करू शकते.याप्रसंगी आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांबरोबर  सुनिल चांदेरे, शांताराम इंगवले , नंदुशेठ भोईर, अनंता आखाडे, गणपत मेंगडे , कोमल वाशिवले, अंकुश मोरे, बाळासाहेब चांदेरे,भगवान नाकती,कालिदास गोपलघारे, सचिन आमराळे,  सुनिल वाडकर , बाबा कंधारे, अमित कंधारे, विलास बेडेकर, सचिन आमराळे,सुखदेव मांडेकर,राजेश मेहता मुळशी तालुक्यातील वारकरी संप्रदायातील सर्व प्रमुख मंडळी, सर्व गावातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच,  पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश मारणे यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
15.1 ° C
15.1 °
15.1 °
82 %
0kmh
0 %
Mon
23 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!