15.1 C
New Delhi
Monday, November 10, 2025
Homeमहाराष्ट्रवाकड–पुनावळे अंतर्गत व डिपी रस्त्यांचे काम युध्दपातळीवर पूर्ण करा

वाकड–पुनावळे अंतर्गत व डिपी रस्त्यांचे काम युध्दपातळीवर पूर्ण करा

आमदार शंकर जगताप यांचे अधिका-यांना स्पष्ट निर्देश

वाहतूक कोंडीच्या त्रासापासून नागरिकांना मिळणार दिलासा

चिंचवड -: वाकड, पुनावळे, मामुर्डी दरम्यान सुरु असलेल्या अंतर्गत आणि डिपी रस्त्याच्या कामापासून या परिसरातील रहिवाशी, तसेच वाहनचालकांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे. त्यासाठी येथील सुरू असलेले सर्व अंतर्गत आणि डिपी रस्त्यांचे काम युध्दपातळीवर पूर्ण करा, असे स्पष्ट निर्देश चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी संबधित अधिका-यांना दिले आहेत.

चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्याकडून मुंबई-बैंगलोर महामार्गावरील वाहतूक कोंडी व समस्यांकडे सातत्याने लक्ष दिले जात आहे. त्यांच्याकडून या महामार्गावरील समस्यांपासून नागरिकांची सुटका करण्यासाठी वारंवार सूचना केल्या जात आहे. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून हे काम करण्याच्या सूचना दिल्यानंतर काही दिवसांपूर्वी वाकड, पुनावळे, मामुर्डी दरम्यानच्या अंतर्गत आणि डिपी रस्त्यांचे प्रत्यक्ष काम सुरू झाले. त्या कामाची आमदार शंकर जगताप यांनी बुधवारी (दि. 15 ऑक्टोबर) भाजप नगरसेवक, पदाधिकारी, संबंधित अधिकाऱ्यांसह केली. त्यावेळी अधिका-यांना त्यांनी आवश्यक ते निर्देश दिले. या पाहणी दरम्यान नागरिकांना लवकरात लवकार वाहतूक कोंडीपासून दिलासा कसा देता येईल, यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या आहेत. आवश्यक त्या ठिकाणी डांबरीकरण करून घेणे, अतिक्रमण हटविणे, सर्विस लाईन शिफ्ट करणे आणि वाहतूक मार्ग मोकळा करणे अशी कामे तातडीने पूर्ण करून घेणे. त्याकरिता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, वाहतूक विभाग आणि महावितरण अशा संबधित सर्व यंत्रणांसोबत समन्वय राखून काम करा, अशा सूचनाही त्यांनी अधिका-यांना यावेळी केल्या.


या भागातील नागरिकांना गेल्या वर्षभरापासून वाहतूक कोंडीचा मोठा त्रास होत आहे. अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक घेऊन अधिका-यांना हे काम जलद गतीने पूर्ण करण्याचे‌ स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानंतर कायमस्वरूपी उपाय म्हणून सेवा रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. भुजबळ चौक ते भूमकर चौकापर्यंतचे काम मोठ्या प्रमाणात पूर्ण झाले असून आता उर्वरित अंतर्गत आणि डिपी  रस्त्यांचे काम जलद गतीने पूर्ण व्हावे. यासाठी प्रत्यक्ष पाहणी करून संबधित अधिका-यांना सूचना केल्या आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर रहिवाशी व वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
शंकर जगताप, आमदार, चिंचवड विधानसभा मतदारसंघ

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
15.1 ° C
15.1 °
15.1 °
82 %
0kmh
0 %
Mon
23 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!