24.1 C
New Delhi
Tuesday, December 9, 2025
Homeमहाराष्ट्रवाहतूक समस्येवर दीर्घकालीन नियोजन आराखडा तयार करा !

वाहतूक समस्येवर दीर्घकालीन नियोजन आराखडा तयार करा !

वाहतूक व पायाभूत सुविधांबाबतची महापालिकेत घेतली आढावा बैठक....

वाहतूक व पायाभूत सुविधांबाबतची महापालिकेत घेतली आढावा बैठक….

पिंपरी,  :  पिंपरी चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या व वाढती वाहनसंख्या विचारात घेऊन भविष्यात शहरामध्ये वाहतूक कोंडीसारख्या समस्या निर्माण होऊ नयेत, यासाठी आगामी १५ वर्षांचा विचार करून महापालिकेने नियोजन आराखडा तयार करावा, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

     पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांची आढावा बैठक महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील माजी महापौर मधूकर पवळे सभागृहात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते.

   या बैठकीस आमदार महेश लांडगेशंकर जगतापउमा खापरेमाजी आमदार अश्विनी जगताप,माजी महापौर राहूल जाधव,नितीन काळजे,माजी नगरसदस्य नामदेव ढाकेशत्रुघ्न काटेविकास डोळसड.मोरेश्वर शेडगेनिगडी नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडेमहापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटीलविजयकुमार खोराटेतृप्ती सांडभोरसह आयुक्त मनोज लोणकरमुख्य वित्त व लेखा अधिकारी प्रविण जैनशहर अभियंता मकरंद निकमनगर रचना व विकास विभागाचे उपसंचालक किशोर गोखलेआरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणेमुख्य अभियंता प्रमोद ओंभासेसहशहर अभियंते मनोज शेठीयाअनिल भालसाखळेसहा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवारस्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादवमुख्य उद्यान अधिक्षक महेश गारगोटेउपायुक्त अण्णा बोदडेडॉ. प्रदीप ठेंगलपंकज पाटीलममता शिंदेराजेश आगळेसंदीप खोतसिताराम बहुरेसहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरेउमेश ढाकणेअतुल पाटीलअमित पंडितअजिंक्य येळेक्षेत्रीय अधिकारी तानाजी नरळेकिशोर ननावरेनिवेदिता घार्गेपूजा दूधनाळेअश्विनी गायकवाडराजाराम सरगरमुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडेविशेष अधिकारी किरण गायकवाडजनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

     पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील घनकचरा व्यवस्थापनसांडपाणी प्रक्रिया प्रकल्पवाहतूक व्यवस्थानदी पुनरुज्जीवन प्रकल्पआरोग्य व्यवस्थावैद्यकीय व्यवस्था आदी सोयीसुविधांबाबत करण्यात येत असलेल्या कामाचा आढावा बैठकीमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला.

     चंद्रकांत पाटील म्हणालेशहरातील कचरासांडपाणीवाहतूक असे प्रश्न सोडवण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांना गती देण्यात यावी. रस्त्यांवरील खड्ड्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात यावे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाण्याचा पुनर्वापर करण्यावर भर द्यावा. फुटपाथ अतिक्रमणमुक्त राहतीलयासाठी सुयोग्य नियोजन करावेअशा सूचनाही मंत्री पाटील यांनी दिल्या. पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाढणारी वाहनसंख्या लक्षात घेऊन वाहतूक कोंडीसारख्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. भविष्यात ही समस्या गंभीर होऊ नयेयासाठी पुढील १५ ते २० वर्षांचा विचार करून वाहतूक नियोजन आराखडा तयार करण्याची आवश्यकता आहे. तसेच तात्काळ उपाययोजनांसाठी पोलीस विभागाशी समन्वय साधून सिग्नल दुरुस्तींसह वाहतूक नियोजनासाठी इतर उपाययोजना करण्यास प्राधान्य द्यावेअसेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
24.1 ° C
24.1 °
24.1 °
29 %
4.6kmh
0 %
Tue
26 °
Wed
26 °
Thu
26 °
Fri
25 °
Sat
26 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!