15.1 C
New Delhi
Monday, November 10, 2025
Homeमहाराष्ट्रहरित स्वप्नांची नगरी: पिंपरी-चिंचवडचा शाश्वत विकासाचा नवा अध्याय!

हरित स्वप्नांची नगरी: पिंपरी-चिंचवडचा शाश्वत विकासाचा नवा अध्याय!

‘इंटरनॅशनल अर्बन अँड रिजनल को-ऑपरेशन आशिया आणि ऑस्ट्रेलाशिया कार्यक्रम’चा भारतात शुभारंभ

पिंपरी,-: नवी दिल्ली येथे आयोजित अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स फेस्टिव्हल २०२५ दरम्यान “समावेशक, सक्षम व शाश्वत शहरे” या विषयाखाली ‘इंटरनॅशनल अर्बन अँड रिजनल को-ऑपरेशन’ (IURC) आशिया आणि ऑस्ट्रेलाशिया कार्यक्रमाचा भारतात अधिकृत शुभारंभ करण्यात आला. हरित स्वप्नांची नगरी: पिंपरी-चिंचवडचा शाश्वत विकासाचा नवा अध्याय!या कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेला आमंत्रित करण्यात आले होते.

यावेळी ‘आययूआरसी इंडिया किक-ऑफ मिटिंग’ या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. सदर सत्रात युरोपियन युनियनचे प्रतिनिधी, राष्ट्रीय भागीदार तसेच सहा भारतीय पायलट शहरे, ज्यामध्ये चेन्नई, पिंपरी चिंचवड, जबलपूर, कटक, गँगटोक आणि लेह यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी शाश्वत शहरी विकासासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या संधींवर सखोल चर्चा झाली.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या योजनांविषयी दिली माहिती

या सत्रात मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेचे प्रतिनिधित्व करत शहराच्या शाश्वत विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांविषयी माहिती दिली. त्यांनी शहरी नवोपक्रम, सार्वजनिक वाहतूक सुधारणा, हवामान लवचिकता आणि पर्यावरण संरक्षण क्षेत्रातील महापालिकेचे प्रयत्न अधोरेखित केले. तसेच वाढत्या नागरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या पायाभूत आव्हानांवर मात करण्यासाठी बहुस्तरीय समन्वयाची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. पिंपरी चिंचवड महापालिका सध्या हवामान अनुकूल विकास, हरित गतिशीलता, कचरा व्यवस्थापन आणि ऊर्जा कार्यक्षमतेसाठी नाविन्यपूर्ण उपाययोजना राबवित आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या माध्यमातून महापालिका जागतिक पातळीवरील सर्वोत्तम शहरी धोरणे आत्मसात करण्याच्या दिशेने प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी सांगितले.

चर्चेदरम्यान हवामान अनुकूलता, सर्क्युलर इकॉनॉमी, डिजिटल नवोपक्रम आणि शाश्वत वित्तपुरवठा या सामाईक प्राधान्य क्षेत्रांवर सविस्तर विचारमंथन झाले. युरोप आणि भारतीय प्रतिनिधींनी या भागीदारीला स्मार्ट सिटीज मिशन आणि नॅशनल अर्बन पॉलिसी फ्रेमवर्कशी सुसंगत ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. सत्राचा समारोप संयुक्त कृती आराखडे, क्षमता-वृद्धी उपक्रम आणि तांत्रिक देवाणघेवाण सुरू करण्याच्या वचनबद्धतेने झाला. या उपक्रमाने युरोप–भारत सहकार्याच्या एका नव्या पर्वाची सुरुवात केली आहे.

यावेळी व्हिक्टोरिया कैडालोवा (कार्यक्रम व्यवस्थापक, युरोप सर्व्हिस फॉर फॉरेन पॉलिसी इन्स्ट्रुमेंट्स, बँकॉक), लुट्झ कोप्पेन (धोरण अधिकारी, डायरेक्टरेट जनरल फॉर रिजनल अँड अर्बन पॉलिसी), पाब्लो गांदारा (टीम लीडर, आययूआरसी आशिया आणि ऑस्ट्रेलाशिया), तसेच स्मिता सिंग (वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक, युरोप प्रतिनिधीमंडळ) आदी उपस्थित होते.


आंतरराष्ट्रीय पातळीवर शहरांदरम्यान सहकार्य वाढविण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. ‘आययूआरसी आशिया आणि ऑस्ट्रेलाशिया कार्यक्रम’ अंतर्गत भारत–युरोप शहर भागीदारीत आमच्या शहराचा समावेश होणे ही अभिमानाची बाब आहे. यामुळे शाश्वत शहरी विकासासाठी नवनवीन कल्पना, तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीच्या संधी निर्माण होतील.
— विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका


पिंपरी चिंचवड हे वेगाने वाढणारे आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देणारे शहर आहे. ‘अर्बन इनोव्हेशन, मोबिलिटी आणि क्लायमेट रेसिलियन्स’ या क्षेत्रांत युरोपियन शहरांसोबत सहकार्य करण्याची मोठी संधी ‘आययूआरसी इंडिया’च्या माध्यमातून मिळाली आहे. बहुउद्देशीय संस्थांमधील समन्वय आणि वेगवान शहरीकरण ही आमची आव्हाने असली तरी, या भागीदारीतून त्यावर सक्षम उपाय शोधता येतील असा आम्हाला विश्वास आहे.
संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
15.1 ° C
15.1 °
15.1 °
82 %
0kmh
0 %
Mon
23 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!