पुणे – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पुणे जिल्हा पुरोहित आघाडीच्या शिष्टमंडळाने परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांची JW Marriott या पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट घेऊन, पुरोहित वर्गाशी संबंधित विविध महत्त्वाच्या मागण्यांवर चर्चा केली. (Akhil Bharatiya Brahman Mahasangh)http://Akhil Bharatiya Brahman Mahasanghया बैठकीत सुमारे दीड तास सकारात्मक संवाद झाला असून, पुरोहित कल्याणासाठी ठोस पावले उचलण्याचे आश्वासन अध्यक्षांकडून देण्यात आले.
🪔 प्रमुख मागण्या
शिष्टमंडळाने बैठकीत पुरोहितांच्या जीवनमानाशी निगडित काही प्रमुख मागण्या सरकारदरबारी मांडाव्यात अशी भूमिका घेतली. त्यामध्ये —
▪️ पुरोहितांना नियमित मासिक मानधन देण्यात यावे
▪️ पुण्यात भव्य वेदभवनाची निर्मिती करून वैदिक शिक्षणाची जोपासना व्हावी
▪️ पुरोहितांसाठी मोफत आरोग्य सेवा किंवा हेल्थ इन्शुरन्स योजना राबवण्यात यावी
या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत कॅ. दामले यांनी महामंडळाच्या माध्यमातून पुरोहित वर्गालाही विविध योजनांमध्ये लाभार्थी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
📚 शिक्षण आणि आर्थिक मदतीसाठी पुढाकार
बैठकीत विद्यार्थ्यांसाठी विशेष आर्थिक सहाय्याची घोषणा करण्यात आली. देशांतर्गत व परदेशातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी कर्जरूप अनुदान आणि व्याज परतावा योजना लवकरच लागू करण्याचे ठोस आश्वासन महामंडळ अध्यक्षांकडून देण्यात आले.
🕉️ संघटनात्मक उपक्रम सुरू
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात पुरोहित गुरुजी, वेदपाठशाळा, वेदभवन, शिकणारे विद्यार्थी, अध्यात्मिक प्रवचनकार आणि कीर्तनकार यांचे संघटन अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानातून ब्राह्मण पुरोहित वर्गाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास महासंघाने व्यक्त केला आहे.
📋 नियुक्त्या आणि आगामी बैठक
पुणे जिल्ह्यात आतापर्यंत १६० हून अधिक पुरोहितांना नियुक्तीपत्रे देण्यात आली असून, लवकरच या सर्व पुरोहितांची जिल्हास्तरीय बैठक आयोजित केली जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष मंदार रेडे यांनी दिली.
या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष मंदार रेडे, पुरोहित आघाडी अध्यक्ष संतोष वैद्य, उपाध्यक्ष राहुल भाले शास्त्री, सरचिटणीस मनीष जोशी गुरुजी, संपर्क प्रमुख उमेश जोशी, पुरोहित महिला संपर्क प्रमुख सौ. सुरेखा जोशी, श्रीपाद काशीकर, अतुल जोशी आणि किशोर जोशी गुरुजी उपस्थित होते


