15.1 C
New Delhi
Monday, November 10, 2025
Homeमहाराष्ट्रहर्षवर्धन फाऊंडेशनचा साड्यांचा उत्सव — २ हजार महिलांच्या चेहऱ्यावर फुलले सणाचे हास्य!”

हर्षवर्धन फाऊंडेशनचा साड्यांचा उत्सव — २ हजार महिलांच्या चेहऱ्यावर फुलले सणाचे हास्य!”

नवरात्रात आनंदाचा वर्षाव — हर्षवर्धन फाऊंडेशनकडून हजारो महिलांना साडी वाटप

“कोजागिरीच्या पूर्वसंध्येला समाजसेवेचा सोहळा — सनी आणि स्नेहल निम्हण यांचा उपक्रम ठरला कौतुकास्पद”

“गरजू महिलांसाठी आनंदाचा सण — हर्षवर्धन फाऊंडेशनकडून २ हजार साड्या वाटून सन्मानाचा उपक्रम”

पुणे – – सणांचा आनंद केवळ श्रीमंत घरांपुरता मर्यादित न राहता, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा या भावनेतून हर्षवर्धन फाऊंडेशनने एक प्रशंसनीय उपक्रम राबवला. नवरात्रोत्सव आणि कोजागिरी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला एरंडवणे येथे आयोजित विशेष सोहळ्यात गरीब, गरजू, कामगार आणि गृहिणी अशा २ हजार महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे महिलांच्या चेहऱ्यावर उत्सवाचे हास्य खुलले आणि परिसरात एक आनंददायी वातावरण निर्माण झाले.

या उपक्रमाचे आयोजन स्नेहल सनी निम्हण शिवसेना ( उबाठा ) कोथरूड विधानसभा विभाग संघटिका प्रभाग २९ ,३१ ) व हर्षवर्धन फाऊंडेशनचे संस्थापक सनी निम्हण यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते. समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांपर्यंत सणाचा आनंद पोहोचवण्याचा हा त्यांचा सलग प्रयत्न असून, “देणं म्हणजे आनंद देणं” या विचाराने त्यांनी अनेक समाजोपयोगी उपक्रम यापूर्वीही राबवले आहेत.

कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे शिवसेना (उबाठा गट) शहरप्रमुख गजानन भाऊ थरकुडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हेमंत धनवे, दिनेश बराटे, अनिल माझिरे, राम बाटुंगे, विजय रावडे, पंकज लवांडे तसेच महिला आघाडीच्या सविता मते, माया भोसले, शोभा सुर्वे, सलोनी शिंदे, वृषाली तापकिर, कांचन चुनेकर आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व पाहुण्यांनी समाजकार्याच्या या प्रयत्नाचे मनापासून कौतुक केले.

या प्रसंगी स्नेहल सनी निम्हण म्हणाल्या, “सण हा केवळ पूजा आणि उत्सवापुरता मर्यादित नसून, तो समाजात सकारात्मकता आणि एकता निर्माण करण्याचे साधन आहे. महिलांच्या आनंदातच घराचे सुख आहे. म्हणूनच प्रत्येक महिलेला सन्मानाने आणि आनंदाने सण साजरा करता यावा, हा आमचा हेतू आहे.”

फाऊंडेशनचे संस्थापक सनी निम्हण म्हणाले, “हर्षवर्धन फाऊंडेशन नेहमीच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असते. गरजूंसाठी सण आनंदाचा ठरावा, यासाठी अशा उपक्रमांना पुढेही चालना देण्यात येईल.”

साड्यांचे वाटप झाल्यानंतर उपस्थित महिलांनी स्नेहल निम्हण आणि फाऊंडेशनच्या टीमचे आभार मानले. अनेकांनी सांगितले की, “आज खूप दिवसांनी कुणीतरी आपल्यासाठी असा विचार केला. साडीपेक्षा मोठं म्हणजे आदर आणि आपुलकी मिळाली.” या उपक्रमामुळे एरंडवणे परिसरात एक सामाजिक ऐक्याचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. हर्षवर्धन फाऊंडेशनने पुन्हा एकदा दाखवून दिले की, समाजसेवा म्हणजे फक्त मदत नाही तर भावनांचे जतन आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
15.1 ° C
15.1 °
15.1 °
82 %
0kmh
0 %
Mon
23 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!