20.1 C
New Delhi
Monday, November 10, 2025
Homeमहाराष्ट्रभारतीय संस्कृतीत स्त्रीला प्रथम स्थान!

भारतीय संस्कृतीत स्त्रीला प्रथम स्थान!

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून कोथरुड मधील ३००० पेक्षा जास्त कन्यांचे पूजन

भारतीय संस्कृतीत स्त्रीला प्रथम स्थान दिलं असून, तिची पूजा केली पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. तसेच, मुलींना वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.

प्रतिवर्षी प्रमाणे नवरात्रौत्सवानिमित्त ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून कन्यापूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात ३००० पेक्षा जास्त कन्यांचे पूजन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या संयोजिका आणि पुणे शहर चिटणीस प्रा. डॉ. अनुराधा येडके, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉ. संदीप बुटाला, भाजप कोथरुड मध्य मंडल महिला मोर्चा अध्यक्षा हर्षाली माथवड, माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, वासंती जाधव, वृषाली चौधरी, छाया मारणे, ॲड. मिताली सावळेकर, राज तांबोळी, गिरीश खत्री, अजित जगताप, दीपक पवार, अनिता तलाठी, प्राची बगाटे, पूनम कारखानिस, अपर्णा लोणारे, सुजाता जगताप यांच्यासह भाजपचे इतर पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

ना. पाटील म्हणाले की, भारतीय संस्कृतीत स्त्रीला प्रथम स्थान दिलं गेलं असून तिची पूजा केली जाते. आपण आजही बुद्धीची देवता सरस्वती, महालक्ष्मी, शक्तीस्वरुपा जगदंबेची नेहमीच पूजा करतो. ही सर्व स्त्रिचीच रुपे आहेत. पण पुरुषी मानसिकतेमुळे स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते. कारण, स्वातंत्र्यपूर्व काळात परकीय आक्रमकांपासून स्त्रियांचे रक्षण करण्यासाठी तिला घरातच बंदिस्त केले. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर तिला आपण पुन्हा बाहेर आणले नाही. चूल आणि मूल यामध्येच ती अडकली होती.

मात्र २०१४ पासून हे चित्र बदलते आहे. आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. तिला उच्च शिक्षणामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींना फी माफीचा निर्णय घेतल्याने मुलींचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढते आहे. विविध विद्यापीठांमध्ये पीएचडी धारकांमध्ये मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे स्त्रियांना वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

ते पुढे म्हणाले की, कोथरुड मतदारसंघात मानसी उपक्रमाच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींच्या व्यक्तिमत्व विकासावर भरल दिला आहे. सुखदा उपक्रमाच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल कुटुंबातील गरोदर महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. उद्योग सुरु करण्यासाठी महिला बचत गटांना मदत केली जात आहे, असे एकना अनेक उपक्रमाच्या माध्यमातून कोथरुड मधील महिलांना मदत केली जात आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
20.1 ° C
20.1 °
20.1 °
56 %
0kmh
0 %
Mon
25 °
Tue
28 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
28 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!