पुणे: जनसेवा न्यास, हडपसर आणि अमनोरा येस्स फौंडेशनतर्फे गुढीपाडव्यानिमित्त रविवार, ३० मार्च २०२५ रोजी हिंदू महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी, मराठी नववर्षाच्या स्वागतासोबतच 100 कोटी लिटर पाणी बचतीचा संकल्प (save water) केला जाणार आहे. यासाठी महिलांची एक भव्य दुचाकी रॅली आयोजित करण्यात आली आहे, ज्यात 5000 महिलांचा सहभाग अपेक्षित आहे. रॅलीचा समारोप अमनोरा क्रिकेट ग्राउंडवर होणार असून, त्यानंतर महिलांना पाणी (Women empowerment water conservation)बचतीची शपथ घेण्यात येईल.अमनोरा येस्स फौंडेशन आणि जनसेवा न्यासाने (Amnora Yes Foundation water conservation) एकत्र येऊन पाणी बचतीसाठी जनजागृती केली आहे. विशेषतः हडपसर आणि परिसरातील महिलांना पाणी बचतीसाठी प्रेरित करून त्यांना ‘जलज्योती’ म्हणून गौरवित करण्यात येणार आहे. रॅलीच्या माध्यमातून पाणी बचतीच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण केली जाईल.

रॅलीचे आयोजन १७ विविध ठिकाणांहून एकाच वेळी करण्यात येईल. महिलांचा सहभाग पारंपरिक नऊवारी साडी आणि मराठमोळ्या फेट्यात असणार आहे. महिलांचा दुचाकी रॅलीत सहभाग हा एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी उपक्रम ठरणार आहे.अमनोरामध्ये पाणी बचतीचा प्रकल्प यशस्वीपणे सुरु झाला आहे. स्थानिक महिलांना पाणी बचतीचे (Water saving pledge women rally) महत्त्व पटवून दिले आहे, त्यात ‘अवंतिका’ म्हणून ओळखल्या जाणार्या घरकाम करणाऱ्या महिलाही समाविष्ट आहेत. या महिलांचा दुचाकी रॅलीत सक्रिय सहभाग असणार आहे. रॅलीच्या शेवटी ढोल-ताशाच्या वादनाच्या वातावरणात महिलांनी पाणी बचतीसाठी शपथ घ्यावी, अशी योजना आहे.
प्रयागराज महाकुंभ जलपूजन: महिलांच्या जलपूजनाद्वारे पाण्याच्या बचतीला महत्त्व देणे आणि समाजात जलसंवर्धनाची जागरूकता वाढविणे हा महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.
