23.1 C
New Delhi
Tuesday, March 17, 2026
Homeमहाराष्ट्रपिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भोसरीत २४८ मतदान केंद्र कर्मचाऱ्यांचे सखोल प्रशिक्षण

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भोसरीत २४८ मतदान केंद्र कर्मचाऱ्यांचे सखोल प्रशिक्षण


भोसरी, :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक ३, ४, ५ व ७ साठी नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आज कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी येथे दोन सत्रांमध्ये यशस्वीरीत्या पार पडले.
या प्रशिक्षण कार्यक्रमास निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दिप्ती सूर्यवंशी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रविण ढमाले, तानाजी नरळे, सूर्यकांत मोहिते, इ क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता शिवाजी वाडकर यांच्यासह एकूण २४८ मतदान केंद्रांवर नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दोन सत्रांत पार पडलेल्या प्रशिक्षणामध्ये संगणकीय सादरीकरणाद्वारे मतदान केंद्रावर जाताना तसेच प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी घ्यावयाच्या खबरदारीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मतदान प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पार पाडावयाच्या कर्तव्यांची माहिती देण्यात आली.


यामध्ये मतदान यंत्रांची योग्य जोडणी, मॉक पोल प्रक्रिया, मतदानाच्या विविध टप्प्यांवरील दक्षता, निवडणूक साहित्य प्राप्त करणे, त्याची तपासणी करणे तसेच मतदानानंतर निवडणूक साहित्य जमा करण्याच्या प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणामुळे आगामी महापालिका निवडणूक प्रक्रिया अधिक शिस्तबद्ध व पारदर्शकपणे पार पडण्यास मदत होणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
23.1 ° C
23.1 °
23.1 °
56 %
2.1kmh
20 %
Tue
25 °
Wed
34 °
Thu
33 °
Fri
29 °
Sat
30 °

Most Popular

Recent Comments