23 C
New Delhi
Wednesday, March 4, 2026
Homeमहाराष्ट्रएमआयटी सांस्कृतिक संध्या संगीत महोत्सवाचा पं. उपेन्द्र...

एमआयटी सांस्कृतिक संध्या संगीत महोत्सवाचा पं. उपेन्द्र भट यांच्या सुमधूर गायनाने समारोप

पुणे, – : विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे भारततर्फे लोणी काळभोर येथील विश्वराज बंधारा, विश्वशांती गुरूकुल, राजबाग येथे आयोजित केलेल्या दोन दिवसीय एमआयटी सांस्कृतिक संध्या संगीत महोत्सवाचा समारोप पं. उपेन्द्र भट यांच्या सुमधूर गायनाने झाला.
यावेळी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, सौ. उषा विश्वनाथ कराड,  डॉ. मंगेश तु. कराड, विश्वशांती संगीत कला अकादमीच्या कार्यकारी संचालिका सौ. ज्योती कराड-ढाकणे, प्रा. स्वाती कराड चाटे, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, दूरदर्शनचे माजी संचालक डॉ. मुकेेश शर्मा आणि प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये उपस्थित होते.
३१ डिसेंबर रोजी झालेल्या ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ च्या समारोप प्रसंगी मध्यरात्री १२.००वा त्याग व समर्पणाचे प्रतीक असलेल्या यज्ञकुंडामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर, विकार, विकृती व विकल्प सारख्या दुर्गुणांची आहुती देण्यात आली. पुढील २०२६ वर्ष अत्यंत सुखाने, समाधानाने व शांततेने पार पडावे यासाठी प्रार्थना करण्यात आली.
विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” नव वर्षाच्या पूर्व संध्येला आपल्यातील अवगुणांची आहुती देऊन उद्यापासून शांतीमय जीवन प्रत्येकाने जगावे. भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात श्रेष्ठ संस्कृती आहे. याचे अनुकरण करून आपल्या आयुष्याची वाटचाल करावी. तरूणांनी स्वधर्म, स्वाभिमान आणि स्वत्व जागवून खर्‍या अर्थाने भारतीय अस्मिता जागविण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न करीत आहोत.”
या संगीत महोत्सावात अदिती रिसवाडकर यांनी कथ्थक नृत्य सादर केले. त्यानंतर तेजस उपाध्ये यांचे व्हायोलिन वादन, श्रीमती कल्याणी बोंद्रे, विश्वशांती संगीत कला अकादमीच्या विद्यार्थ्यांचे गायन झाले.
प्रा. शशांक दिवेकर यांचे सुगम संगीत गायन, वारकरी संप्रदायातील सुप्रसिद्ध गायिका गोदावरीताई मुंडे यांचे गायन झाले.  सरतेशेवटी पं उपेन्द्र भट यांच्या सुमधूर गायनाने या कार्यक्रमाचा समारोप झाला.
गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये यांनी सर्वांना नव वर्षाच्या शुभेच्छा देऊन आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
23 ° C
23 °
23 °
21 %
4.1kmh
0 %
Wed
36 °
Thu
38 °
Fri
38 °
Sat
38 °
Sun
39 °

Most Popular

Recent Comments