15.1 C
New Delhi
Monday, November 10, 2025
Homeमहाराष्ट्रमानवतेचा धर्म पाळणे महत्वाचे - आमदार सिद्धार्थ शिरोळे

मानवतेचा धर्म पाळणे महत्वाचे – आमदार सिद्धार्थ शिरोळे

माजी उपमहापौर सुनीता वाडेकर यांच्या वतीने पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दोन कंटेनर मदत रवाना

पुणे :  महाराष्ट्राच्या अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर हालाकीची परिस्थिती ओढावली आहे. अशा परिस्थितीत दिवाळी सारखा सण साजरा करताना त्यांच्या दु:खाची जाणीव आपण ठेवणे गरजेचे आहे. यालाचा मानवतेचा धर्म म्हणतात आणि तो पाळणे महत्वाचे आहे असे प्रतिपादन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केले.

पुण्याच्या माजी उपमहापौर सुनीता वाडेकर आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर यांच्या वतीने सोलापू आणि मराठवाड्यातील पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत म्हणून अन्नधान्य, शालेय साहित्य याचे दोन कंटेनर आमदार शिरोळे यांच्या हस्ते झेंडा दाखवून रवाना करण्यात आले यावेळी शिरोळे बोलत होते. 

याप्रसंगी सुनिता वाडेकर, रशुराम वाडेकर, शिक्षण मंडळ माजी सदस्य अमित मुरकुटे , रिपब्लिकन पक्षाचे  शिवाजीनगर मतदारसंघ अध्यक्ष अविनाश कदम, माजी नगरसेवक संभाजी शिंदे, माजी नगरसेवक आनंद छा जेड सामाजिक कार्यकर्ते शहाबुद्दीन काजी, जुबेर पिरजादे, रमेश नाईक आदींसह रिपाइं चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, माजी उपमहापौर सुनिता वाडेकर या पदावर असताना ज्या प्रमाणे काम करत होत्या त्याच प्रमाणे त्या आजही काम करत आहेत. दरवर्षी रिक्षाचालक आणि कष्टकरी सफाई कर्मचारी यांच्या समवेत वाडेकर दाम्पत्य दिवाळी साजरी करत आहेत. यंदा त्यांनी सामाजिक भान ठेवत मानवतेचा धर्म जपत मराठवाडा आणि सोलापूर येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांना अन्न धान्य व शिक्षण साहित्याचे मदतीचे किट पाठवले आहेत. ही बाब कौतुकास्पद आहे.

परशुराम वाडेकर म्हणाले, नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी नुकसान झालेल्या मराठवाडा आणि सोलापूर येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत किट पाठवत आहोत. दोन कंटेनर भरून पाठवलेली ही मदत त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड करेल अशी आशा आहे. सण साजरा करताना त्यांच्या सोबत आपली संवेदना आहेत, हेच सांगण्याचा हा प्रयत्न आहे.

दरम्यान, दरवर्षी प्रमाणे यंदाही विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्या वतीने रिक्षाचालक, आरोग्य कर्मचारी आणि  सफाई कर्मचारी यांच्यासाठी दिपावली स्नेह समारंभ आयोजित करण्यात आला होता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
15.1 ° C
15.1 °
15.1 °
82 %
0kmh
0 %
Mon
23 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!