24.1 C
New Delhi
Tuesday, December 9, 2025
Homeमहाराष्ट्रश्री.विठ्ठल रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा संपन्न

श्री.विठ्ठल रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा संपन्न

पंढरपूर – कार्तिकी एकादशी रविवार, दिनांक 2 नोव्हेंबर रोजी संपन्न झाली. दरवर्षी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, चांगला महुर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना 24 तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते. त्यानुसार दि. 26 ऑक्टोबर रोजी श्रींचा पलंग परंपरेनुसार काढण्यात आला होता व श्री विठ्ठलास लोड व श्री रूक्मिणीमातेस तक्या देण्यात आला होता. त्यामुळे काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती इत्यादी राजोपचार प्रक्षाळपुजेपर्यंत बंद ठेवून भाविकांना जास्तीत जास्त वेळ दर्शन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी सांगितले.

आज रविवार, दि. 09 नोव्हेंबर रोजी मुहूर्तानुसार श्री.विठ्ठलाची व श्री.रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा अनुक्रमे मंदिर समिती सदस्या ॲड माधवीताई निगडे व शकुंतलाताई नडगिरे यांच्या हस्ते संपन्न झाली. सदर पुजेच्या सुरवातीला प्र. व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत व लेखाधिकारी मुकेश अनेचा यांच्या हस्ते श्रींस पहिले स्नान घालण्यात आले.

तसेच श्री. विठ्ठलास सोने मुकुट, नाम निळाचा, कौस्तुभ मणी, दंड पेट्या जोड मोठा, हिऱ्याचा कंगण जोड, मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी २ पदरी, मोत्याची कंठी १ पदरी पदकास मोती, मारवाडी पेट्याचा मोत्याचा हार, मस्त्य जोड, लक्ष्मी पदकासह लॉकेट, तुळशीच माळ १ पदरी, शिरपेच लहान १० लोलक असलेला, शिरपेच मोठा २ लोलक असलेला, तोडे जोड, जवेची माळ २ पदरी, एकदाणी इत्यादि अलंकार परिधान करणत्यात आलेले आहेत.

तसेच रुक्मिणी मातेस सोने मुकुट, वाक्य जोड, तानवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवमानी पदक, लक्ष्मीहार, जवेच्या माळा, मोहरांची माळ, पुतळ्याची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा इत्यादी अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.

याशिवाय, देवाचा शिणवटा/थकवा घालविण्यासाठी आर्युवेदीक काढा श्रीस नैवेद्य म्हणून रात्री शेजारती वेळी दाखविण्यात येणार आहे. आजपासून श्री. विठ्ठलास व श्री.रूक्मिणी मातेस पहाटे होणारी काकडा आरती, नित्यपुजा, महानैवेद्य, पोषाख, धुपारती व शेजारती इत्यादी राजोपचार सुरू करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
24.1 ° C
24.1 °
24.1 °
29 %
4.6kmh
0 %
Tue
26 °
Wed
26 °
Thu
26 °
Fri
25 °
Sat
26 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!