10.1 C
New Delhi
Tuesday, January 14, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानपीपीपी अंतर्गत आयसीएआर-अटारी (झोन आठवा) आणि धानुका ॲग्रीटेक यांच्या संयुक्त केव्हीके कार्यशाळेचे...

पीपीपी अंतर्गत आयसीएआर-अटारी (झोन आठवा) आणि धानुका ॲग्रीटेक यांच्या संयुक्त केव्हीके कार्यशाळेचे पुण्यात आयोजन

पुणे : पुणे कृषि महाविद्यालय येथे आज झालेल्या आयोजित कृषि विज्ञान केंद्र कार्यशाळेच्या मुहूर्तावर कृषिक्षेत्रात विकसित नवीन तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोचविण्यासाठी विविध सरकारी govयंत्रणा आणि खाजगी सहभागी धानुका अॅग्रिटेक लिमिटेड यांनी एकत्रितपणे चालविलेल्या प्रयत्नांतील नवा अध्याय सुरू झाला आहे. हे प्रयत्न देशभरात आणि विशेषत: आयसीएआर-अटारी ( ICAR-Agricultural Technology Application Research Institute) च्या विभाग ८ मध्ये होत आहेत. महाराष्ट्र गोवा आणि गुजरात यांचा या विभाग ८ मध्ये समावेश आहे.agricultrature

या कार्यशाळेत ‘प्रगत कृषि तंत्रज्ञान अति दुर्गम गावांपर्यंत पोचवून आणि वापरात आणून शेती करण्याच्या पद्धतींत क्रांतिकारी बदल करत कृषिक्षेत्राची शाश्वत वृद्धी घडवून आणणे’ या उद्दिष्टावर भर देण्यात आला. कृषिक्षेत्रात नवकल्पनांचा आविष्कार आणि विकास यांना चालना देण्यात सरकार आणि खाजगी क्षेत्र यांच्या भागीदारीची ताकद आणि क्षमता यांचे दर्शन घडले. या कार्यशाळेसाठी सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील महत्त्वाच्या संस्थांचे प्रतिनिधी एकत्र आले आणि संबंधित विषयांचे ज्ञान आणि सर्वोत्तम कार्यपद्धती यांचे आदान प्रदान होऊन भविष्यात सहकार्य आणि क्षमतेचा एकत्रित वापर वाढवण्यासाठीचा मार्ग खुला झाला.

संशोधन संस्था आणि शेतकरी यांच्यातील अंतर कमी करून शाश्वत कृषिपद्धती आणि प्रभावी तंत्रज्ञान दुर्गम अतीदुर्गम भागांत पोचविण्याच्या प्रक्रियेतील कृषि विज्ञान केंद्रांची भूमिका अधोरेखित झाली.

उपस्थित मान्यवर प्रतिनिधी: डॉ. पी जी पाटील ( कुलगुरू, महात्मा फुले कृषि विद्यापीठ) हे या कार्यशाळेचे प्रमुख अतिथि म्हणून उपस्थित होते. अन्य मान्यवरांमध्ये डॉ.संजय भावे ( कुलगुरू, बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ ) डॉ. इंद्र मणी ( कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ ); डॉ.शरद गडाख ( कुलगुरू, पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ ) आणि डॉ. के बी कथिरिया ( कुलगुरू, कृषि विद्यापीठ ) यांचा समावेश होता. कार्यशाळेसाठी डॉ. कौशिक बॅनर्जी (संचालक, NRCG) डॉ. वाय जी प्रसाद ( संचालक CICR) डॉ. आर ए मराठे संचालक, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र ) डॉ. मनीष दास, ICAR-DMAPR, डॉ. दिलीप घोष ( संचालक Central Citrus Research Institute), डॉ. बर्मन (अतिरिक्त संचालक, ICAR) आणि डॉ. एस के रॉय ( संचालक ATARI विभाग ८ ) हे विशेष अतिथि म्हणून उपस्थित होते. त्यांचे मौल्यवान चिंतन आणि तज्ज्ञ कौशल्य यामुळे शेती क्षेत्रातील सध्याच्या आव्हाने आणि संधी यांबद्दलची सर्वंकष समज उपलब्ध झाली आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर तसेच कल्पक कृषि तंत्रांचे महत्त्व सहभागी प्रतिनिधींना समजले.

उद्दिष्ट: शेतकरी, कृषि विज्ञान केंद्रे आणि सर्व संबंधितांना सर्वोत्तम उपलब्ध कृषि तंत्रज्ञान माहीत करून देणे हे या कार्यशाळेचे मूळ उद्दिष्ट होते. उत्पादन, उत्पादकता आणि शेतक-यांना मिळणारे उत्पन्न यात मोठी वाढ हे लक्ष्य आहे. हा प्रयत्न महत्त्वाचा आहे कारण भारतात ६.५ लाख गावे आणि १४ कोटी शेतकरी त्यावर अवलंबून आहेत. ही संख्या फारच मोठी असल्यामुळे कोणत्याही एका विभागाने किंवा संस्थेने करण्याच्या दृष्टीने हे काम प्रचंड मोठे आहे आणि म्हणूनच त्यासाठी सरकारी आणि खाजगी क्षेत्र यांनी एकत्र येण्याची गरज आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
fog
10.1 ° C
10.1 °
10.1 °
100 %
2.6kmh
100 %
Tue
22 °
Wed
22 °
Thu
19 °
Fri
22 °
Sat
20 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!