26.1 C
New Delhi
Sunday, February 9, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानबीएमडब्ल्यू ग्रुपकडून इंडियामध्‍ये रिटेल डॉट नेक्स्टचे पदार्पण

बीएमडब्ल्यू ग्रुपकडून इंडियामध्‍ये रिटेल डॉट नेक्स्टचे पदार्पण

पुणे : बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाने भारतात रिटेल डॉट नेक्स्ट डिलरशिप्‍सच्‍या लाँचची घोषणा केली आहे. रिटेल डॉट नेक्स्ट मध्‍ये सर्वोत्तमता देण्‍यासाठी आणि आधुनिक गरजांची पूर्तता करण्‍यासाठी क्‍यूरेट करण्‍यात आलेल्‍या रिइमेजिन सेवा व सुविधांचा समावेश असेल. ३६ महिन्‍यांमध्‍ये ३३ शहरांमधील ५६ फॅसिलिटीजमध्‍ये रिटेल डॉट नेक्स्टची अंमलबजावणी करण्‍यात येईल.

बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे अध्यक्ष चीफ एक्झिक्‍युटिव्‍ह ऑफिसर श्री. विक्रम पावाह म्‍हणाले की , ”बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियामध्‍ये लक्‍झरी अनुभवाला नव्‍या उंचीवर घेऊन जात बदल घडवून आणत आहोत. रिटेल डॉट नेक्स्टच्‍या लाँचसह आम्‍ही अनुभवांना अधिक उत्‍साहित करण्‍यासोबत त्‍यामध्ये परिवर्तन घडवून आणत आहोत. बीएमडब्ल्यू डिलरशिपला प्रत्‍येक भेटीमधून अद्वितीय विश्‍वामध्‍ये प्रवेश केल्‍यासारखे वाटेल, जेथे आधुनिकता, प्रगती आणि अस्‍सल लक्‍झरी कव्‍हरेजचा अनुभव मिळेल. रिटेल डॉट नेक्स्ट डिलरशिप्‍स ‘फिजिटल’ इनोव्‍हेशन्‍सचा समावेश करत ग्राहक सहभागामध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत, जेथे आकर्षक असलेल्‍या वातावरणांमध्‍ये प्रत्‍यक्ष डिजिटलचा अनुभव मिळतो, जे दूरदर्शी आहेत”.

रिटेल डॉट नेक्स्ट लक्‍झरी ऑटोमोटिव्‍ह सेगमेंटमधील ऑटोमोटिव्‍ह रिटेल अनुभवाला नव्‍या उंचीवर घेऊन जाईल. ही डिलरशिप सर्वांना त्‍यांच्‍या सेल्‍स किंवा सर्विस गरजांकडे न पाहता विनासायास अनुभव देते. या डिलरशिपमध्‍ये डिजिटल इनोव्‍हेशन व वैयक्तिकृत सर्विसचे संयोजन आहे, ज्‍यामधून डायनॅमिक व सर्वसमावेशक वातावरण मिळते. लेआऊटमध्‍ये खुल्‍या स्‍पेसेससह किमान डिझाइन एलीमेंट्सचा समावेश आहे, ज्‍यामुळे शोरूमचा सहजपणे अनुभव मिळतो. संपूर्ण फॅसिलिटीमध्‍ये हाय-टेक डिजिटल इंटरफेसेसचा समावेश करण्‍यात आला आहे, ज्‍यामुळे संभाव्‍य ग्राहकांना वेईकल वैशिष्‍ट्यांना एक्‍स्‍प्‍लोअर करता येते, त्‍यांच्‍या पसंतींना सानुकूल करता येते आणि सर्वोत्तम शिफारशी मिळतात.

तसेच, डिझाइनमध्‍ये खाजगी सल्‍लामसलत आणि वेईकल हँडओव्‍हर्ससाठी विशेष क्षेत्रे आहेत, ज्‍यामधून प्रत्‍येक परस्‍परसंवाद वैयक्तिकृत आणि संस्‍मरणीय असण्‍याची खात्री मिळते. रिटेल डॉट नेक्स्ट सह, बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचा दूरदर्शी रिटेल स्‍पेस निर्माण करण्‍याचा मनसुबा आहे, जे कंपनीच्‍या वेईकल्‍सना दाखवण्‍यासोबत लक्‍झरी, नाविन्‍यता आणि ग्राहक समाधानाप्रती ब्रँडच्‍या कटिबद्धतेला देखील सादर करेल.

रिटेल डॉट नेक्स्ट ‘सेंट्रल कस्‍टमर वॉकवे’च्‍या माध्‍यमातून अभ्‍यागत आणि वेईकल्‍सना प्रथम प्राधान्‍य देते. रिटेल डॉट नेक्स्ट शोरूम लायटिंग, साऊंड, तापमान, उत्‍पादन स्‍टेजिंग व सजावट अशा विविध उपायांचे परिपूर्ण ऑर्केस्‍ट्रेशन आहे. विविध लायटिंग अनुभव व सजावटीचे घटक फर्निचर, कार्स इत्‍यादी सारख्‍या सर्व टचपॉइण्‍ट्समध्‍ये घरगुती वातावरणासारखे आरामदायी वातावरण निर्माण करतात. बॅटरी इलेक्ट्रिक वेईकल वापरकर्ते डिलरशिपमध्‍ये त्‍यांच्‍या इलेक्ट्रिक वेईकल्‍सना चार्ज करण्‍यासाठी एसी / डीसी फास्‍ट-चार्जिंग सुविधांचा देखील लाभ घेऊ शकतात.

बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाने गुरूग्राममध्‍ये बर्ड ऑटोमोटिव्‍ह रिटेल डॉट नेक्स्ट शोरूमच्‍या लाँचची घोषणा केली. श्री. गौरव भाटिया, डिलर प्रिन्सिपल, बर्ड ऑटोमोटिव्‍ह म्‍हणाले, ”बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियासोबतचा आमचा सहयोग वर्षानुवर्षे विकसित होण्‍यासह निपुण झाला आहे आणि या प्रवासाचा आम्‍हाला अत्‍यंत अभिमान वाटतो. गुरूग्राम प्रांतामध्‍ये आम्‍ही संपादित केलेल्‍या उल्‍लेखनीय वाढीमधून आमचा सामायिक दृष्टिकोन आणि कटिबद्धता दिसून येते.”

ही फॅसिलिटी ८, ९० स्केवर फिट हून अधिक जागेवर पसरलेली आहे आणि तळमजला व पहिल्‍या मजल्‍यावर अनुक्रमे बीएमडब्ल्यू व मिनी कार्सना दाखवते. अल्‍ट्रा-मॉडर्न शोरूम १० वेईकल्‍सच्‍या श्रेणीला दाखवते . समर्पित वेईकल हँडओव्‍हर लाऊंज प्रत्‍येक ग्राहकाची कार डिलिव्‍हरी संस्‍मरणीय अनुभव असण्‍याची खात्री घेण्‍यासाठी विचारपूर्वक डिझाइन करण्‍यात आले आहे. तसेच, लाइफस्‍टाइल अँड अॅक्‍सेसरीज झोनमध्‍ये मर्चंडाइज आणि अॅक्‍सेसरीजची नवीन श्रेणी प्रदर्शनार्थ आहे. कस्‍टमर इंटरअॅक्‍शन लाऊंज सेल्‍स कन्‍सल्‍टण्‍ट्ससोबत बीएमडब्ल्यू किंवा मिनी चे मालक बनण्‍याच्‍या विविध पैलूंबाबत चर्चा करण्‍यासाठी आरामदायी वातावरण देते. तसेच, ग्राहक त्‍यांच्‍या आवडीच्‍या उत्‍पादनांसाठी आकर्षक फायनान्‍स आणि इन्‍शुरन्‍स पर्यायांचा आनंद घेऊ शकतात.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
26.1 ° C
26.1 °
26.1 °
12 %
2.8kmh
3 %
Sun
27 °
Mon
28 °
Tue
29 °
Wed
28 °
Thu
27 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!