29.1 C
New Delhi
Friday, September 19, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानसंरक्षण परिवहन आणि पर्यायी ऊर्जा क्षेत्रातील जागतिक घडामोडी मांडणारे आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे आयोजन

संरक्षण परिवहन आणि पर्यायी ऊर्जा क्षेत्रातील जागतिक घडामोडी मांडणारे आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे आयोजन

पुणे: संरक्षण आणि परिवहन (एमईटी) तसेच पर्यायी ऊर्जा आणि हिट ट्रीटमेंट सिनर्जी (एचटीएस) या क्षेत्रातील पदार्थ अभियांत्रिकी मटेरियल इंजीनियरिंग उपकरणे आणि तंत्रज्ञान मांडणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात २० हून अधिक देशातील प्रतिनिधी येण्याची शक्यता आहे. हे प्रदर्शन बॉम्बे एक्झिबिशन सेंटर गोरेगाव मुंबई येथे ६ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

एएसएम इंटरनॅशनल इंडिया चॅप्टरचे संयोजक तसेच टॅफकॉनचे व्यवस्थापकीय संचालक आय पी वाधवा यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले की एमईटी आणि एचटीएस २०२४ हे सर्वात सर्वसमावेशक व्यासपीठ असून भारत सरकारचे अनेक मंत्रालय व राज्य सरकारमधील मंत्रालयांनी त्याला पाठबळ देऊन त्यात सहभाग घेतला आहे. यात सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, उद्योगांमधील तज्ञ, आघाडीच्या कॉर्पोरेट कंपन्या आणि स्टार्टअप एकत्र येणार आहेत. तसेच भारत आणि जगातील उद्योगांशी संबंधित विविध घटक येणार आहेत.

ही तीन दिवसांची परिषद दर दोन वर्षांनी आयोजित करण्यात येते. यात एक विचार प्रवर्तक सत्र होणार असून त्यात देशातील तसेच प्रदेशातील उद्योग, शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्ती वक्त्यांच्या पॅनेलमध्ये सहभागी होणार आहेत. प्रगत तसेच स्मार्ट पदार्थ व त्यांच्या प्रक्रिया तसेच हिट ट्रीट तंत्रज्ञानातील अगदी ताज्या घडामोडींबाबत ते विचार विनिमय करतील.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे (एसआयडीएम) सोसायटी ऑफ डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्स यांच्या सहकार्याने एक विशेष सत्र होईल. यात सशस्त्र दले, सरकार आणि खासगी संघटनातील विचारवंत आणि मुख्य धोरण निर्माते “मेक इन ” अधिक सामर्थ्यवान करण्यासाठी विश्वासार्ह पदार्थ आणि तंत्रज्ञान याबाबत तपशीलवार चर्चा करून सहयोग करतील. यात संशोधन व विकास यांचाही समावेश असेल. या उपक्रमात १५ पेक्षा अधिक देशातील ६०० प्रतिनिधी येणार असून सोबतच १५० तांत्रिक शोधनिबंध, १० हजार लोकांची उपस्थिती आणि सुमारे ४०० स्टॉल असतील अशी अपेक्षा आहे. यात स्टार्टअप साठी एक विशेष दालन तसेच व्हीडीएमए यांचे जर्मन दालन असणार आहे.

भारतीय संरक्षण क्षेत्र एका क्रांतीच्या उंबरठ्यावर असून आपला देश किमान ७५ देशांना संरक्षण उपक्रमांची निर्यात करत आहे. संरक्षण क्षेत्रावरील खर्च गेल्या पाच वर्षात २० टक्क्यांनी वाढला आहे. नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन (एनआयपी) अंतर्गत १.४ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स किमतीचे मूलभूत सोयीसुविधा प्रकल्प २०२४-२५ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. भारताचे परिवहन आणि लॉजिस्टिक्स क्षेत्र पुढील दशकात ४.५ टक्के दराने वाढण्याची शक्यता आहे.
पर्यायी ऊर्जेच्या बाबतीत भारत, अमेरिका, ब्राझील आणि चीन हे परस्पर सहकार्याच्या दृष्टीने एक जागतिक जैवइंधन संघटना (जीबीए) स्थापन करण्यासाठी चर्चा करत आहेत. हायड्रोजनसाठी ८ लाख कोटी रुपये गुंतविण्याचे भारताचे लक्ष्य आहे. तो २०३० पर्यंत २५ टक्के ग्रे हायड्रोजन ची जागा घेईल.

प्रामुख्याने डीआरडीओ सीएसआयआर भारतीय रेल्वे एनएमडीसी आणि संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उद्योग यांच्यासहित अनेक सरकारी संस्था यात सहभागी होण्याची शक्यता आहे. मोठ्या कॉर्पोरेटच्या संदर्भात टाटा, महिंद्रा अँड महिंद्रा, लार्सन अँड टुब्रो, जेएसडब्ल्यू,रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंडाल्को, भारत फोर्ज आणि सुझलॉन एनर्जी यांचा उल्लेख करता येईल.
या कार्यक्रमाचे महत्त्व विशद करताना आयपी वाधवा म्हणाले की पदार्थांमधील प्रगती ही उत्पादनाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. अधिक हलक्या, मजबूत आणि अधिक कार्यक्षम पद्धतीने अनोख्या पद्धतीने उत्पादनांची रचना करण्याच्या दृष्टीने त्यांचे कळीचे महत्त्व आहे. टॅफकॉनच्या वतीने सह आयोजित करण्यात येणारी ही ५ वी एमईटी आणि १५ वी एचटीएस आजपर्यंतची सर्वात मोठी ठरणार आहे. सर्व भागधारकांना आपल्या ताज्या इनोवेशन्स, नवीन उपक्रम,यंत्रसामुग्री आणि उपकरणे जागतिक पातळीवर मांडण्याची ती उत्कृष्ट संधी ठरेल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
29.1 ° C
29.1 °
29.1 °
84 %
1kmh
40 %
Thu
29 °
Fri
33 °
Sat
38 °
Sun
38 °
Mon
38 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!