आंतरराष्ट्रीय सिकटॅब परिषदेची सांगता
पुणे — सिकटॅब आंतरराष्ट्रीय परिषदेची सांगता भारत सरकारचे सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या प्रसंगी ग्रामीण विकास, कृषी आणि वनीकरण मंत्रालय, लाओ पीडीआरचे उपमहासंचालक अनोसॅक फेंगथिमावोंग,
गांबिया सहकाराचे रजिस्ट्रार जनरल ॲबा जिब्रिल संकरेह, पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट संस्थेचे संचालक प्रा. पार्थ रे, इंस्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट गुजरातचे उमाकांत दास वामनिकॉम व
सिकटॅबच्या संचालक डॉ. हेमा यादव आदी मान्यवर उपस्थित होते. या परिषदेमध्ये मॉरिशस, बँकोक, नेपाल, श्रीलंका, केनिया, भूतान, नामबिया, झांबिया अशा विविध 12 देशातील तसे भारतातील विविध राज्यातील सहकार क्षेत्रातील दिग्गज मान्यवर, नेते, धोरणकर्ते आणि सहकारी तज्ञ एकत्र आले होते.
मोहोळ म्हणाले की २०२५ हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून त्याची घोषणा झाली आहे. याचेच औचित्य साधून वामनीकॉममध्ये तीन दिवसीय सिकटॅब ही आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली. या परिषदेमध्ये बारा देशातून 36 प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. वामनीकॉममध्ये चांगले प्रकारचे परिसंवाद या परिषदेच्या माध्यमातून पार पडले. सहकार क्षेत्रात वामनीकॉम संस्थेचे योगदान वाखाणण्याजोगे आहे. ते पुढे म्हणाले की ग्रामीण भागात सहकार क्षेत्रामुळे शाश्वत विकास झाला आहे. सहकारी बँका यांना देखील बळकटीकरण करण्यासाठी भाजप सरकारने विशेष प्रयत्न केले आहेत.

डॉ. हेमा यादव म्हणाल्या कि वामनिकॉम येथे तीन दिवसीय चाललेल्या या परिषदेमध्ये सहकार क्षेत्रातील विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी वामनिकॉम सहकार क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनी विचारांची देवाण घेवाण तसेच सहकार क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या परिषदेच्या माध्यमातून भविष्यकाळात भारताबरोबर आशिया खंडातील देशांना याचा फायदा होणार आहे. सिकटॅब परिषदेच्या माध्यातून ग्रामीण भागात देखील रोजगाराच्या संधी उपलब्द होणार असून वामनिकॉम संस्थेतील अनेक विध्यार्थीना देशाच्या कानाकोपऱ्यात तसेच जगभरात त्यांना सहकार क्षेत्रात रोजगार मिळणार आहे.
परिषदेचे प्रास्ताविक डॉ. हेमा यादव यांनी केले. तर सूत्रसंचालन सोनल कदम यांनी सूत्रसंचालन केले आणि परिषदेचे आभार डॉ. शंतनू घोष यांनी मानले.

चौकट –
तीन दिवसीय सिकटॅब परिषदेत बारा देशांचा सहभाग
तीन दिवसीय सिकटॅब परिषदेत बारा देशांचा सहभाग होता. या परिषदेमध्ये सहकार क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. शेती, शेतकरी, शेतविषय धोरणे, अर्थव्यवस्था, सहकार क्षेत्रात आलेली डिजिटल कार्यप्रणाली, यु.पी.आय प्रणाली अशा विविध बाबींवर चर्चा करण्यात आली.