21.1 C
New Delhi
Sunday, March 23, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानसोनालिकाने जानेवारीत१०,३५० ट्रॅक्टरची सर्वाधिक एकत्रित विक्रीची केली नोंद

सोनालिकाने जानेवारीत१०,३५० ट्रॅक्टरची सर्वाधिक एकत्रित विक्रीची केली नोंद

पुणे,  : भारताचा क्रमांक एकचा निर्यात ब्रँड सोनालिका ट्रॅक्टर्सने २०२५  हे नवीन वर्ष प्रेरणादायक घडामोडीने सुरू केले असून जानेवारीतील १०,३५० ट्रॅक्टरच्या आजवरच्या सर्वाधिक एकत्रित विक्रीची नोंद केली आहे. सोनालिकाच्या रोमहर्षक प्रवासातील या नव्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या यशासाठी कृषी प्रयोगशीलता पुरविण्यावर जोरदार भर देण्यासह कंपनीची सातत्यपूर्ण वाढ आणि देशांतर्गत उद्योगापेक्षा वरचढ कामगिरीचा समावेश आहे. कंपनीने जानेवारी २०२४ मध्ये एकत्रित ९,७६९ ट्रॅक्टर विक्रीची नोंद केली होती.


भारताचे कृषी क्षेत्र शाश्वततेचे युग आणि सतत सुधारित होत असलेल्या कृषी पद्धतींमधून वाटचाल करत आहे. अर्थव्यवस्थेच्या वाढीचे इंधन म्हणून कृषी क्षेत्रावर केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात दिलेला भर पाहता ट्रॅक्टर उद्योगसुद्धा देशाच्या विकासाला चालना देणारी शक्ती म्हणून कायम राहील. प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेतीचा अनुभव एका नव्या पातळीवर नेता यावी यासाठी त्यांना शक्तिशाली, कार्यक्षम आणि विश्वासार्ह कृषी यंत्रसामुग्री मिळेल, याची सुनिश्चिती करत असताना सोनालिका ट्रॅक्टर उद्योगात सातत्याने नवे मानदंड निर्माण करत आहे. सोनालिका हा  १५० पेक्षा अधिक देशांमध्ये विश्वसनीय ब्रँड असून ग्राहकांच्या समाधानाची हमी देण्यासाठी कंपनी आपल्या कटिबद्धतेवर ठाम आहे. त्यातून पुढील अभूतपूर्व कामगिरीसाठी प्रेरणा मिळते.


या अचंबित करणाऱ्या कामगिरीबद्दल इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेडचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक श्री. रमण मित्तल म्हणाले, आम्ही नेहमीच आमच्या विश्वासावर आणि सर्वोत्तम उत्पादने व सेवा उपलब्ध करून देणे, आमच्या भागधारकांचे हित जपणे आणि कोणत्याही शॉर्टकटशिवाय नैतिकतेने व्यवसाय करणे या तीन मुख्य तत्वांवर  अवलंबून राहिलो आहोत. त्यामुळे ट्रॅक्टर उद्योगात कामगिरीचे नवीन मानदंड स्थापित करण्यासाठी आमच्या मर्यादा ओलांडण्यासाठी आम्हाला नेहमीच प्रेरणा मिळाली आहे.


श्री. मित्तल पुढे म्हणाले की दक्षिण, पश्चिम आणि मध्य क्षेत्रांमध्ये पाण्याच्या साठ्यात लक्षणीय वाढ झाली असून ती गेल्या १० वर्षांच्या सरासरी एलपीएपेक्षा जास्त आहे. शिवाय, अनुकूल ला निना परिस्थितीमुळे रब्बी पीक क्षेत्र आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. वर्ष २०२५ मध्ये आणखी मोठे टप्पे गाठण्याची आमची अपेक्षा असून कस्टमाईज्ड ट्रॅक्टर वितरित करण्यासाठी आणि प्रत्येक प्रदेशात शेतकऱ्यांच्या समृद्धीला चालना देण्यासाठी  आम्ही वचनबद्ध आहोत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
21.1 ° C
21.1 °
21.1 °
64 %
1kmh
0 %
Sat
25 °
Sun
34 °
Mon
37 °
Tue
39 °
Wed
39 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!