31.3 C
New Delhi
Tuesday, April 29, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानअ‍ॅमेझॉन इंडिया 2025 मध्ये ‘आश्रय’ विश्रांती केंद्रांचे नेटवर्क 100 पर्यंत वाढवणार

अ‍ॅमेझॉन इंडिया 2025 मध्ये ‘आश्रय’ विश्रांती केंद्रांचे नेटवर्क 100 पर्यंत वाढवणार

अ‍ॅमेझॉन (amazone india) इंडियाने 2025 पर्यंत भारतभरात 100 आश्रय केंद्रांचे नेटवर्क वाढवणार असल्याचे आज जाहीर केले. आश्रय केंद्रे ही विशेष विश्रांतीस्थळे असून ती डिलिव्हरी असोसिएट्सना ई-कॉमर्स (E-comerce)आणि लॉजिस्टिक्स इकोसिस्टममध्ये वातानुकूलित आसनव्यवस्था, स्वच्छ पिण्याचे पाणी, इलेक्ट्रोलाइट्स, मोबाईल चार्जिंग पॉइंट्स, स्वच्छतागृहे, प्राथमिक उपचार किट्स आणि अल्पोपहार सुविधा पुरवतात. ही या उद्योगक्षेत्रातील पहिलीच संकल्पना असून त्यायोगे वितरण काम करणाऱ्या सहकाऱ्यांना आणि लॉजिस्टिक्स भागीदारांना मोठ्या गर्दीच्या ठिकाणी विशेष विश्रांती केंद्रे पुरविली जात आहेत. पेट्रोल पंप आणि व्यावसायिक भाडे जागांवर स्थित, ही केंद्रे अत्यावश्यक सुविधांनी सुसज्ज आहेत. आश्रय केंद्रे दररोज सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत, आठवड्याचे सातही दिवस, वर्षभर चालू असतात आणि सर्व डिलिव्हरी असोसिएट्सना एका भेटीत 30 मिनिटांपर्यंत मोफत प्रवेश दिला जातो. प्रत्येकवेळी 15 लोकांपर्यंत सामावून घेण्याची क्षमता असलेली ही केंद्रे सुलभ पार्किंग सुविधाही पुरवतात.

अ‍ॅमेझॉनच्या भारत आणि ऑस्ट्रेलिया ऑपरेशन्सचे उपाध्यक्ष अभिनव सिंग म्हणाले, “डिलिव्हरी असोसिएट्सचे आरोग्य, स्वास्थ्य कल्याण आणि आराम ही आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्याची गोष्ट आहे. आश्रय केंद्रे वातानुकूलित विश्रांती क्षेत्रे पुरवतात. यामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी, प्राथमिक उपचार किट्स आणि चार्जिंग पॉइंट्ससारख्या अत्यावश्यक सुविधा आहेत. या सुविधांमुळे डिलिव्हरी असोसिएट्स त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातही सुरक्षित आणि आरामदायक राहू शकतात. ई-कॉमर्स आणि लॉजिस्टिक्स परिसंस्थेमधील सर्व डिलिव्हरी असोसिएट्ससाठी ही केंद्रे उघडल्याने संपूर्ण लॉजिस्टिक्स समुदायाला मदत होते आणि उद्योगाच्या दर्जात वाढ करण्याची आमची बांधिलकी यातून दिसून येते. आम्हाला आतापर्यंत मिळालेल्या प्रतिसादाने प्रेरणा मिळाली असून आम्ही ही संकल्पना भारतभर 100 केंद्रांपर्यंत विस्तारण्यास वचनबद्ध आहोत.”

सुरुवात झाल्यापासून या आश्रय केंद्रांमध्ये हजारो भेटींची नोंद झाली आहे. यातून ही संकल्पना आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत समुदायासाठी त्याची वाढती गरज दिसून येते. या विस्तारामुळे डिलिव्हरी असोसिएट्ससाठी प्रवेशयोग्यता आणखी वाढेल आणि ग्राहकांच्या ऑर्डर्स पूर्ण करताना त्यांना विश्वासार्ह विश्रांतीस्थळे मिळतील.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
31.3 ° C
31.3 °
31.3 °
40 %
5.2kmh
1 %
Tue
39 °
Wed
41 °
Thu
42 °
Fri
42 °
Sat
42 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!