15.1 C
New Delhi
Monday, November 10, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानसत्त्वा ग्रुप आणि इनोव्हॅलसकडून जीसीसीबेस प्लॅटफॉर्म सादर

सत्त्वा ग्रुप आणि इनोव्हॅलसकडून जीसीसीबेस प्लॅटफॉर्म सादर

भारतातील जागतिक क्षमता केंद्राच्या वाढीच्या पुढील टप्प्याला मिळणार बळकटी
~ भारताच्या जागतिक क्षमता केंद्राच्या वाढीच्या पुढील टप्प्याला प्रशासन, तंत्रज्ञान आणि भागीदारीद्वारे संस्थात्मक बनविणारा धोरणात्मक उपक्रम ~

मुंबई , : भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधा विकासकांपैकी एक असलेल्या सत्त्वा ग्रुपने इनोव्हॅलससोबत भागीदारीत जीसीसीबेस सादर करण्याची घोषणा केली आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांना संपूर्ण भारतात ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स स्थापन करण्यासाठी आणि त्यांचा विस्तार करण्यासाठी मदत करण्यासाठी डिझाइन केलेला हा एक धोरणात्मक प्लॅटफॉर्म आहे.

जीसीसीबेस हा पायाभूत सुविधांमधील सत्त्वा ग्रुपचे कौशल्य आणि इनोव्हॅलसच्या ऑपरेशनल उत्कृष्टतेवर आधारित असून तो जागतिक उद्योगांसाठी एकीकृत, एंड-टू-एंड इकोसिस्टम उपलब्ध करून देतो. हे उद्घाटन म्हणजे एक परवडणारे स्थान इथपासून ते नवोपक्रम, अभियांत्रिकी आणि डिजिटल परिवर्तनासाठी जागतिक केंद्रापर्यंतच्या भारताच्या उत्क्रांतीमधील महत्त्वाचा क्षण आहे. सखोल जागतिक व्यवसाय भारतात कसे स्थापित होतील आणि कसे वाढतील याची स्थानिक कौशल्य, धोरणात्मक भागीदारी आणि उद्योगातील माहितीचा वापर करून नव्याने व्याख्या करण्याचे जीसीसीबेसचे लक्ष्य आहे. त्यामुळे विनासायास, कार्यक्षम आणि अत्यंत प्रभावी जीसीसीचा विस्तार सुकर होणार आहे.

जागतिक उद्योगात भारताचा धोरणात्मक क्षण
या घडामोडीसाठी ही अत्यंत योग्य वेळ आहे. एक परवडणारे स्थान म्हणून आपल्या ख्यातीच्या खूप पुढे जाऊन भारत नवोपक्रम, अभियांत्रिकी आणि डिजिटल परिवर्तनासाठी जगातील सर्वात गतिमान केंद्र म्हणून उदयास आला आहे. जागतिक कंपन्या आता भारताविषयीच्या धोरणाची नव्याने आखणी करत आहेत. ते भारताकडे बॅक ऑफिस म्हणून नाही तर एक नाविन्यशीलतेचे ऊर्जाकेंद्र आणि धोरणात्मक वाढीचे इंजिन म्हणून पाहत आहेत. जीसीसीबेस हे या बदलाचे प्रतीक असून ते जागतिक उद्योगांना भारतात विनाअडथळा बांधकाम, विस्तार आणि कामकाज करणे शक्य होईल अशी एकीकृत, तंत्रज्ञान-सक्षम परिसंस्था उपलब्ध करून देते.

आज भारतात १,६०० हून अधिक जागतिक क्षमता केंद्रे असून ते २० लाखांहून अधिक व्यावसायिकांना रोजगार पुरवतात आणि वार्षिक ४६ अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त आर्थिक मूल्य निर्माण करतात. ही केंद्रे आता केवळ व्यवहारांच्या प्रक्रियांपुरती मर्यादित राहिलेली नाहीत. ते आता उत्पादनाचे डिझाईन, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा आणि प्रगत विश्लेषणात जागतिक प्रवाहांचे नेतृत्व करतात.

भारतात इ. स. २०३० पर्यंत २,५०० पेक्षा अधिक जीसीसी असतील, असा उद्योगाचा अंदाज आहे. त्यामुळे ११० अब्ज डॉलर्सची संधी निर्माण होईल आणि उच्च-कौशल्य क्षमतेच्या अतिरिक्त दहा लाख नोकऱ्या निर्माण होतील. नॅसकॉमच्या माहितीनुसार, जगातील शीर्ष २००० कॉर्पोरेशनपैकी ६० टक्क्यांहून अधिक कंपन्या भारतात आधीच कार्यरत आहेत किंवा जीसीसी स्थापन करण्याची योजना आखत आहेत. भारतातील प्रतिभांची विपुलता, डिजिटल पायाभूत सुविधा आणि धोरण स्थिरता यामुळे ते आकर्षित झाले आहेत.ही गती मिळूनही जीसीसी स्थापन करणे विनाकारण गुंतागुंतीचे आहे. त्यामुळे रिअल इस्टेट, कायदापालन, प्रतिभा संपादन आणि ऑपरेशनल गव्हर्नन्समध्ये अनेक भागधारकांमधून वाट काढावी लागते. कंपन्यांना कागदपत्रांवर नव्हे तर नाविन्यपूर्णतेवर लक्ष केंद्रित करायचे आहे. सेटअप प्रक्रियेला संस्थात्मक रूप देऊन आणि गती, पारदर्शकता आणि कायदापालन प्रदान करणारा एकल, जबाबदार प्लॅटफॉर्म तयार करून जीसीसीबेस ही दरी भरून काढते.

सत्त्वा ग्रुपचे स्ट्रॅटेजिक ग्रोथचे उपाध्यक्ष शिवम अग्रवाल म्हणाले, जीसीसीबेसच्या लाँचिंगमुळे भारतातील पहिल्या “स्पेस-टू-स्केल” प्लॅटफॉर्मचेसुद्धा पदार्पण झाले आहे. हे एक एकीकृत मॉडेल असून त्यामध्ये ग्रेड-ए रिअल इस्टेट, पॉड-आधारित जीसीसी डिलिव्हरी आणि डेटा-चालित प्रशासनाची पातळी एकत्र येते. हे सर्व एकाच करारात, एसएलए आणि डॅशबोर्डमध्ये पॅकेज केले जाते. या एकात्मिक रचनेमुळे जागतिक उद्योगांना त्यांचे भारतातील कामकाज स्थापित करताना अनेकदा येणाऱ्या ऑपरेशनल अडचणी दूर होतील. त्यामुळे त्यांना पहिल्या दिवसापासूनच व्यवसायातील लाभांवर लक्ष केंद्रित करणे शक्य होईल.

भारत सरकारच्या व्यवसाय सुलभता आणि डिजिटल-प्रथम कामकाजावर लक्ष केंद्रित करून, जीसीसीबेस प्रोग्राम मॅनेजमेंट टूल्स, कम्प्लायन्स मॉड्यूल्स आणि रिअल-टाइम डॅशबोर्ड यांचे एकत्रीकरण करते. त्यामुळे अनुमान करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. उदयोन्मुख व्यवसाय क्षेत्रांमध्ये भारताच्या विस्तारत्या प्रतिभा क्लस्टर्सचा लाभ घेऊन पारंपारिक महानगरांच्या पलीकडे नवीन वाढीची क्षेत्रे शोधण्यासाठी उद्योजकांना मदत करण्या दृष्टीनेही याची रचना करण्यात आली आहे.

पायाभूत सुविधांची उत्कृष्टता आणि डिजिटल देखरेख यांची सांगड घालून जागतिक गुंतवणूक आकर्षित करणे, उच्च मूल्य असलेले रोजगार निर्माण करणे आणि उद्यम नाविन्यशीलतेसाठी सर्वात विश्वासार्ह आणि सक्षम केंद्र म्हणून भारताची स्थिती मजबूत करणे हे जीसीसीबेसचे उद्दिष्ट आहे. “जगाचे कार्यालय” म्हणून भारत आपले स्थान मजबूत करत असताना बहुराष्ट्रीय कंपन्यांना आत्मविश्वासाने आणि हेतूपूर्वक भारतामधून बांधकाम, नवोन्मेष आणि नेतृत्व करण्यास सक्षम करणारे योग्य वेळेस व धोरणात्मक उत्प्रेरक म्हणून जीसीसीबेस उभे आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
15.1 ° C
15.1 °
15.1 °
82 %
0kmh
0 %
Mon
23 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!