पुणे – : पॉलिसीबाजारची पीओएसपी शाखा असलेल्या पीबीपार्टनर्सने आपल्या वार्षिक प्रमुख व्यवसाय संमेलनाची चौथी आवृत्ती ‘शपथ ४.०’ यशस्वीरित्या संपन्न केली. या वार्षिक संमेलनात पीबीपार्टनर्सच्या प्रमुख भागधारकांना गेल्या वर्षाच्या कामगिरीवर विचार करण्यासाठी आणि येत्या आर्थिक वर्षासाठी मार्गदर्शिका तयार करण्यासाठी एकत्र आणले गेले.
यावेळी पीबीपार्टनर्सचा पाया मजबूत करणे आणि व्यापक, तंत्रज्ञान-सक्षम वाढीसाठी तयारी करणे यावर लक्ष केंद्रित केले गेले. “भारताचे भविष्य सुरक्षित करणे, एका वेळी एक कुटुंब” या आपल्या दृष्टिकोनाचा पुनरुच्चार करत ब्रँडने एजंट भागीदार आणि ग्राहक दोघांसाठीही विमा प्रवासाच्या प्रत्येक टप्प्याला पाठबळ देणारी एक मजबूत भागीदार परिसंस्था तयार करण्याचे आपले ध्येय अधोरेखित केले.
पीबीपार्टनर्स टियर २, टियर ३ आणि उदयोन्मुख ग्रामीण बाजारपेठांमध्ये पीओएसपी-नेतृत्वाखालील वितरणात आघाडीवर आहे. हा ब्रँड आता १९,३०० हून अधिक पिन कोड कव्हर करतो, आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ९०,०००+ सक्रिय भागीदारांना सहभागी करून घेतले आहे (आर्थिक वर्ष २०२३ मधल्या ५९,००० वरून वाढले आहे) आणि दररोज २०,००० पॉलिसीवर किंवा दर चार सेकंदांनी एक पॉलिसीवर प्रक्रिया करतो. त्याचे कर्मचारी ५५६ शहरांमध्ये पसरलेले आहेत आणि हे प्लॅटफॉर्म दररोज ४,५०० हून अधिक एजंट भागीदारांच्या उपजीविकेला थेट आधार देते.
पीबीपार्टनर्सचे सह-संस्थापक श्री. ध्रुव सरीन म्हणाले “आम्ही भविष्याकडे पाहत असताना आमच्या वाढीच्या धोरणाच्या केंद्रस्थानी तंत्रज्ञान आहे. एक भविष्याधारित तंत्रज्ञान एजन्सी तयार करणे हे आमचे ध्येय आहे. एजंट पार्टनरच्या समावेशाचे सुनियोजन करण्यापासून ते मदत सेवा स्वयंचलित करण्यापर्यंत आणि आरएम उत्पादकता सुधारण्यापर्यंत आम्ही संपूर्ण भारतात आणि विशेषतः तंत्रज्ञान व विश्वास एकत्र चालणे आवश्यक असलेल्या ग्रामीण बाजारपेठांमध्ये एक अखंड, सक्षमीकरण अनुभव तयार करत आहोत.”
ते पुढे म्हणाले की, “दुसरे मोठे लक्ष सेवा उत्कृष्टतेवर आहे. आम्ही पारदर्शकता, कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि एजंट भागीदारांना आत्मविश्वासाने वाढण्यास मदत करण्यासाठी एआय चलित सेवा प्रणाली तयार करत आहोत. आमचे यश आम्ही मोठ्या प्रमाणात सातत्यपूर्ण, विश्वासार्ह सेवा किती चांगल्या प्रकारे देतो, यावर अवलंबून असेल.”
पुढे जात असताना पीबी पार्टनर्सनी आगामी वर्षात प्रभाव आणि व्याप्ती वाढवण्यासाठी चार प्रमुख लक्ष्याधारित क्षेत्रांची घोषणा केली ह्यात पाया मजबूत करणे एजंट्सचे यश, ग्राहक सेवा आणि विक्रीतील कार्यक्षमता यांच्यावर लक्ष केंद्रित करून एक व्यापक आणि शाश्वत वाढीचे इंजिन तयार करणे. वाहन विम्याचा अंगीकार वाढवणे मोटर विमा अधिक वेगवान, अधिक सुयोग्य आणि विश्वासू बनवण्यासाठी डिजिटल साधने सुधारणे आणि पॉलिसी खरेदीचा प्रवास एजंट भागीदार व ग्राहकांसाठीही सोपा करणे.आरोग्य तंत्रज्ञान उपाययोजनांचा विस्तार एक सखोल, तंत्रज्ञानाने ऊर्जाप्राप्त आरोग्य विमा व्यासपीठ आणून टियर २, टियर ३ आणि ग्रामीण प्रदेशांमध्ये अधिक चांगली व्याप्ती व सुलभ अनुभवांसह जास्तीत जास्त ग्राहकांना सेवा देणे.
वाणिज्यिक विमा क्षेत्रात वाढ करणे: वाणिज्यिक विमा वर्गवारीत व्याप्ती वाढवण्यासाठी नवीन एजंट नेटवर्कमध्ये समावेश करणे आणि अनुभव सुलभ, वेगवान व भागीदार स्नेही करणे.स्पष्ट प्राधान्यक्रम आणि मजबूत पाया उभारणीसह पीबीपार्टनर्स नवनवीन उपक्रम, गती आणि सेवेद्वारे आर्थिक समावेशनाला चालना देण्यासाठी आणखी एक वर्ष सज्ज होत आहे. त्याचे केंद्रबिंदू त्यांचे एजंट भागीदार आहेत.