मुंबई -: राज्यातील २० शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (ITI) इलेक्ट्रिशियन, सोलार टेक्निशियन आणि इंडस्ट्रियल ऑटोमेशन यासारख्या क्षेत्रांसाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत. यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीने श्री श्री रुरल डेव्हलपमेंट ट्रस्ट (बंगळुरु), स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया फाउंडेशन, आणि दे आसरा फाउंडेशन यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय सामंजस्य करार (MoU) करण्यात आले.
या करारांतर्गत २०२५-२६ पासून पुढील चार वर्षांत टप्प्याटप्प्याने ९७५० युवकांना अत्याधुनिक औद्योगिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये सॉफ्ट स्किल्स, लीडरशिप, सौर ऊर्जा, इंडस्ट्रियल ऑटोमेशन यांचा समावेश असेल.
स्नायडर इलेक्ट्रिक आपल्या CSR निधीमधून प्रयोगशाळा उभारणार असून, (Maharashtra ITI modernization)प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थ्यांना बंगळुरु येथे १५ दिवसांचे विशेष प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे.
या उपक्रमांतर्गत मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अमरावती आदी विभागांतील २० आयटीआय केंद्रांची निवड झाली आहे.
या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, मंत्री मंगल प्रभात लोढा, तसेच मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि इतर अधिकारी उपस्थित होते.(State-of-the-art ITI labs in Maharashtra)
युवकांसाठी सुवर्णसंधी!
महाराष्ट्रातील २० आयटीआय केंद्रांत उभारल्या जाणार अत्याधुनिक प्रयोगशाळा!
सोलार टेक्निशियन, इलेक्ट्रिशियन, आणि इंडस्ट्रियल ऑटोमेशनमध्ये ९७५० युवकांना दर्जेदार प्रशिक्षण मिळणार.
✅ CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक MoU
✅ CSR संस्थांची सहभागिता
✅ रोजगार व उद्योजकतेला चालना