ग्लॅमर इंडस्ट्रीत Mangesh झंझावात थांबता थांबत नाही!
मुंबई – सलग तीन वर्षं राष्ट्रीय स्तरावर अव्वल राहून, मंगेश ने सौंदर्य विश्वात एक नवा इतिहास रचला आहे. 2023, 2024 आणि आता 2025 – अशी तिहेरी किमया करत त्याने ‘Hair & Beauty Show (National)’ या अत्युच्च सन्मानावर पुन्हा एकदा आपली मोहोर उमटवली आहे.ही स्पर्धा केवळ एक व्यासपीठ नसून, हेअर इंडस्ट्रीतील सर्वोत्तम कलाकारांना गौरवण्यासाठीची परंपरा आहे. यंदा देशभरातील नामवंत हेअर आर्टिस्ट्सची उपस्थिती असतानाही, मंगेश च्या “क्रिएटिव्ह कटिंग स्टाईल्स” आणि “ट्रेंड-सेटिंग टेक्निक्स” यांनी परीक्षकांची आणि प्रेक्षकांची मनं जिंकली.2023 व 2024 मध्ये Aalim Hakim यांच्या हस्ते गौरव झाल्यानंतर, यंदा 2025 मध्ये Kapil Sharma (Kapil’s Salon & Academy चे संस्थापक) व Samir Srivastav (CEO, Looks Salon) यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना मंगेश( भावूक झाला. मंचावर त्याच्या डोळ्यांतून ओघळणारे आनंदाश्रू प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या गजरात साक्षीदार ठरले.पुरस्कार स्विकारताना तो म्हणाला –“ही केवळ माझी नव्हे, माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याची, क्लायंटची आणि ‘Flying Scissor’ टीममधील प्रत्येक व्यक्तीची जीत आहे!

‘Flying Scissor Unisex Salon & Academy’ या नावाखाली सुरू केलेल्या आपल्या प्रवासाने आता ब्रँडचं रूप घेतलं आहे. नवोदित हेअर स्टायलिस्टसाठी हे एक प्रेरणादायी केंद्र ठरू लागलं आहे.
या ऐतिहासिक हॅट्रिकनंतर, मंगेश चे यश थांबलेले नाही – उलट, त्याच्या यशस्वी कहाणीचे पुढील पर्व आता सुरू होत आहे!