22.1 C
New Delhi
Thursday, February 6, 2025
Homeविश्लेषणभगवान विष्णूची दिव्य विश्रांती : देवशयनी एकादशी

भगवान विष्णूची दिव्य विश्रांती : देवशयनी एकादशी

अनेक हिंदू परंपरा आणि प्रथांमध्ये एकादशी हा पवित्र विधी आहे. गरुड पुराणात असे म्हटले आहे की भगवान कृष्ण एकादशीला ekadashi “ प्रापंचिक अस्तित्वाच्या सागरात बुडणाऱ्या लोकांसाठी पाच नौकांपैकी एक ” असे म्हणतात. उल्लेखनीय म्हणजे, ती महिन्यातून दोनदा (शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष) हिंदू कॅलेंडरनुसार अकराव्या दिवशी येतो. वर्षभरात एकूण २६ एकादशी तिथी येतात. देवशयनी एकादशी ही एकादशी तिथी म्हणून विशेष महत्त्वाची आहे कारण भगवान विष्णू याच दिवशी वैश्विक निद्रेच्या अवस्थेत जातात असे सर्वत्र मानले जाते. चला तर या आध्यात्मिक दिवसाबद्दल अधिक जाणून घेऊया! (Ekadshi)

सत्यस्थः सत्यसंकल्पः सत्यवित सत्यदस्तथा।
धर्मो धर्मी च कर्मी च सर्वकर्मविवर्जितः॥
कर्मकर्ता च कर्मैव क्रिया कार्यं तथैव च।
श्रीपतिर्नृपतिः श्रीमान सर्वस्यपतिरूर्जितः॥

पराक्रमी विष्णू, सर्वांचा देव, सत्यात स्थित आहे, सत्यासाठी संकल्पित आहे, सत्याचा जाणकार आहे आणि सत्याचा दाता आहे. तो धर्म आहे, धर्माचा पालन करणारा आहे, कर्माचा पालन करणारा आहे आणि तरीही तो कोणत्याही कर्मापासून रहित आहे. तो क्रियेचा कर्ता आहे, तो क्रियेचा स्वीकार करणारा आहे, तो कृती आणि प्रक्रिया आहे.
देवशयनी devashayani एकादशी ही भगवान विष्णूला समर्पित आहे. कारण या दिवशी चातुर्मास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चार महिन्यांच्या कालावधीची सुरुवात होते. या दरम्यान भगवान विष्णू गाढ ध्यानावस्थेत किंवा योग निद्रा अवस्थेमध्ये प्रवेश करतात असे मानले जाते. क्षीरसागरामध्ये म्हणजे दुधाच्या वैश्विक महासागरात शेषनागावर भगवान विष्णू योग निद्रा अवस्थेत आहेत आणि ते चार महिन्यांनंतर प्रबोधिनी एकादशीला किंवा देवूठाणी एकादशीला जागे होतात जी ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या ग्रेगोरियन महिन्यांत येते. भगवान विष्णूची विश्रांती नवबांधणीचे वैश्विक चक्र दर्शवते. हा काळ आत्मनिरीक्षण, आध्यात्मिक वृद्धी आणि परमात्म्याशी सखोल संबंध प्रस्थापित करण्याचा काळ आहे. भक्तांची अशी श्रद्धा आहे की देवशयनी एकादशीचे अनुष्ठान आणि व्रत पाळल्याने त्यांना वैश्विक तालाशी जुळवून घेता येते आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवता येतो.
देवशयनी एकादशीचा इतिहास ekadashi historical
ही कथा भगवान ब्रह्मदेवाने त्यांचा मुलगा नारदांना आणि श्री हरी कृष्णाने युधिष्ठिराला या एकादशीचे महत्त्व आणि ती कशी पाळली पाहिजे हे सांगितले होते.
राजा मंदाता हा राजा युवनाश्वचा मुलगा आणि इक्ष्वाकु वंशाचा म्हणजे सूर्यवंशी राजा होता. एक कर्तव्यदक्ष राजा असल्यामुळे त्याचे राज्य भरभराटीला येत होते आणि लोकांचाही त्याच्यावर विश्वास होता. त्याच्या राज्यातील प्रजेला कोणत्याही प्रकारचा त्रास, रोग, समृद्धीचा अभाव किंवा अकाली मृत्यूचा सामना करावा लागला नाही. परंतु या राज्याला तीन वर्षे प्रचंड दुष्काळाचा सामना करावा लागला आणि त्याचा परिणाम म्हणून त्याला उपासमारीचाही सामना करावा लागला.
आपल्या प्रजेच्या दुरावस्थेने व्यथित झालेल्या आणि त्यांची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे हे जाणून राजाने या समस्येवर बराच काळ मनन केले. परंतु ज्यासाठी त्याला शिक्षा होत आहे असे त्याने केलेले कोणतेही पाप सापडले नाही आणि यावर उपायदेखील सापडत नव्हता. तो अनेक मुनींना भेटला पण काही उपाय सापडला नाही. पुढे, ते अंगिरा मुनी (ऋषी अंगिरस) यांच्या चरणी नतमस्तक झाले. अंगिरा मुनी यांनी राजाला देवशयनी एकादशीला भगवान विष्णूची उपासना करण्याचा आणि संपूर्ण विधीपूर्वक व्रत पाळण्याचा सल्ला दिला आणि त्याचप्रमाणे त्याच्या राज्यानेही संपूर्ण विधी आणि व्रत करावे असे सांगितले. मंदाता आपल्या राज्यात परतला आणि देवशयनी एकादशी पाळली. लवकरच, राज्याला त्याचे हरवलेले वैभव सापडले आणि पाऊसदेखील झाल्याने आनंद आणि समृद्धी आली.
देवशयनी एकादशीचा उपवास
एकादशीचा उपवास हिंदू धर्मातील विविध पंथांमध्ये अत्यंत फायदेशीर मानला जातो आणि देवशयनी एकादशी अधिक पूजनीय आहे कारण ती चातुर्मास प्रारंभ करते. या पवित्र दिवशी व्रत अथवा उपवास पाळणे ही दीर्घ काळासाठी सांस्कृतिक प्रथा बनली आहे.
वैज्ञानिकदृष्ट्या देखील, या काळात चयापचय क्रिया मंद असल्यामुळे पावसाळ्यात सहज पचण्याजोगे हलके पदार्थ खाण्याचा सल्ला आयुर्वेदाच्या प्राचीन भारतीय विज्ञानावर आधारित आहे.
आषाढी एकादशी
महाराष्ट्रात जवळपास 700-800 वर्षांहून अधिक काळ प्रचलित असलेली एक महत्त्वाची परंपरा म्हणजे वारी ; जी वारकरी संप्रदायाद्वारे महाराष्ट्रातील पंढरपूरमधल्या सर्वात पूज्य देवतांपैकी म्हणजे भगवान विष्णूचा अवतार असलेल्या आपल्या लाडक्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी प्रस्थान ठेवते. २१ दिवसांच्या पायी प्रवासात विठोबाच्या पादुका आणि इतर काही संतांच्या राज्यभरातील विविध गावे आणि शहरांमधून निघालेल्या पालख्या पंढरपूरमध्ये एकत्र येतात. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, संत नामदेव आणि इतर अनेक पूज्य संतांच्या पालख्या आपापल्या देवस्थानातून पंढरपूरकडे निघाल्या आहेत.
भक्तांनी तुळशी-माळांनी (पवित्र तुळशीच्या लाकडापासून बनवलेली जपमाळ) विभूषित करून आणि भक्तिगीत गात आणि विठोबाच्या प्रेम आणि भक्तीमध्ये स्वत:ला समर्पित करून हा प्रवास भारून गेलेला आहे. राज्यभरातून येणाऱ्या या सर्व पालख्या आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर एकत्र येतात.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
22.1 ° C
22.1 °
22.1 °
24 %
4.6kmh
0 %
Thu
22 °
Fri
24 °
Sat
26 °
Sun
28 °
Mon
29 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!