25.7 C
New Delhi
Monday, August 25, 2025
Homeआरोग्यआदित्य बिर्ला हॉस्पिटलने गुइलेन बॅरेरुग्णाला दिले नवे जीवनदान

आदित्य बिर्ला हॉस्पिटलने गुइलेन बॅरेरुग्णाला दिले नवे जीवनदान

पुणे : गुइलेन बॅरे सिंड्रोम (GBS) या गंभीर आजारावर यशस्वी मात करून एका ५६ वर्षीय महिलेने आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमध्ये (ABMH) आधुनिक वैद्यकीय उपचारांच्या मदतीने नव जीवनदान मिळाले आहे. फंक्शनल न्यूरोसर्जरीचे सल्लागार डॉ. परेश बाबेल यांच्या देखरेखीखाली सदरील रुग्ण ही रुग्णालयात दाखल झाली होती . आयसीयू टीम, तसेच डॉ. संगीता ठाकरे आणि डॉ. तुषार यादव यांनी रुग्णाच्या उपचारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

महिलेच्या त्रासाची सुरुवात हात-पायात झिणझिण्या येण्यापासून झाली. हा त्रास हळूहळू गंभीर होऊन तिच्या स्नायूंमध्ये कमकुवतपणा जाणवू लागला, ज्यामुळे तिला हालचाल करणेही अशक्य होऊन बसले. तिला कंबरदुखी, सौम्य ताप, आणि हलक्या स्वरूपाचा जुलाबाचा त्रास देखील सुरू झाला. मेंदू आणि मणक्याचे स्कॅन करण्यात आले, पण त्यातून ठोस निदान मिळू शकले नाही. मात्र, स्पाइनल फ्लुइड चाचणीमध्ये अल्ब्युमिनोसाइटोलॉजिकल डिसोसिएशन आढळले, जे न्यूरोलॉजिकल विकाराचे स्पष्ट संकेत होते.

गंभीर स्थिती आणि निदान
डॉ. परेश बाबेल म्हणाले, “सखोल तपासणीनंतर आम्ही रुग्णाला गुइलेन बॅरे सिंड्रोम असल्याचे निदान केले. हा एक दुर्मिळ ऑटोइम्यून आजार आहे, ज्यामध्ये शरीराची प्रतिकारशक्ती परिधीय नसांवर हल्ला करते, ज्यामुळे स्नायूंमध्ये प्रचंड अशक्तपणा होतो. आम्ही त्वरित इंट्राव्हेनस इम्युनोग्लोब्युलिन (IVIG) उपचार सुरू केले. यामुळे प्रतिकारशक्ती नियंत्रित करण्यात आणि पुढील नुकसान टाळण्यात यश मिळाले.”

डॉ. संगीता ठाकरे म्हणाल्या, “रुग्ण ICU मध्ये दाखल झाली तेव्हा तिची स्थिती अत्यंत गंभीर होती. ती शुद्धीत होती, पण वरच्या हातांमध्ये (ग्रेड 3) मर्यादित ताकद होती, तर खालच्या अंगांमध्ये (ग्रेड 1) जवळपास शक्तीच उरली नव्हती. श्वासोच्छवास सुरुवातीला स्थिर असला तरी, ती श्वास लांब धरू शकत नव्हती. आमच्या ICU टीमने त्वरीत श्वसन सहाय्य देत तिच्या स्थितीवर नियंत्रण मिळवले.”

आव्हानात्मक प्रवास
उपचार सुरू असताना, तिसऱ्या दिवशी रुग्णाच्या स्थितीत अधिक बिघाड झाला. तिच्या चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंना कमजोरी जाणवली आणि श्वासोच्छवासात अडचणी येऊ लागल्या, ज्यामुळे व्हेंटिलेटरचा आधार घ्यावा लागला. आठव्या दिवशी श्वसन संक्रमण झाले, ज्यावर अँटिबायोटिक उपचार करावे लागले. ट्रेकिओस्टॉमीमुळे तिचे श्वसन सुलभ झाले.

हळूहळू तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली. २२ व्या दिवशी ट्रेकिओस्टॉमी काढण्यात आली आणि ३० व्या दिवशी ती वॉकरच्या मदतीने उभे राहू शकत होती. त्यानंतर तिची प्रकृती स्थिर झाल्यावर तिला डिस्चार्ज देण्यात आला.

गुइलेन बॅरे सिंड्रोम

गुइलेन बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मिळ आजार आहे, जो दरवर्षी १ लाख लोकांमध्ये १ व्यक्तीला होतो. याचे निदान गुंतागुंतीचे असते. रुग्णाच्या इतिहासावर आधारित तपासणी, न्यूरोलॉजिकल चाचण्या आणि स्पायनल फ्लुइड चाचण्या आवश्यक असतात. आयव्हीआयजी किंवा प्लाझ्मा एक्सचेंजसारख्या उपचारांमुळे रुग्णाला लवकरात लवकर मदत मिळू शकते. जरी बहुतेक रुग्ण बरे होतात, तरी २० टक्के रुग्णांना सहा महिन्यानंतरही हालचालींमध्ये अडचणी येतात. या प्रकरणाने वेळेवर उपचार आणि आक्रमक वैद्यकीय हस्तक्षेपाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
25.7 ° C
25.7 °
25.7 °
87 %
4kmh
100 %
Mon
30 °
Tue
34 °
Wed
35 °
Thu
36 °
Fri
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!