16.1 C
New Delhi
Friday, November 22, 2024
Homeआरोग्यकेंद्र सरकारचा रुग्णांना दिलासा!

केंद्र सरकारचा रुग्णांना दिलासा!

अँटिबायोटिक्स, मल्टीव्हिटामीनसह डायबिटीजसारख्या आजारांवरील ४१ औषधे स्वस्त

मुंबई- एकीकडे महागाईने होरपळणाऱ्या जनतेला केंद्र सरकारने आरोग्याच्या दृष्टीने दिलासा दिला आहे. वातावरण व जीवनशैलीतील बदलामुळं वाढत चाललेले आजार सध्या सर्वसामान्यांना बेजार करत आहेत. आजारांबरोबर आर्थिक पातळीवरही सर्वसामान्यांना लढाई लढावी लागत आहे. अशा कोंडीत सापडलेल्या सर्वसामान्यांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. सरकारने महत्त्वाच्या आजारांवरील ४१ औषधांच्या किंमतीत कपात केली आहे. 

हृदयविकार , लिव्हरशी संबंधित आजारांवरील उपचारांदरम्यान उपयुक्त ठरणाऱ्या सर्व औषधांच्या किमतींबाबत केंद्र सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे. ४१ औषधांच्या आणि ६ फॉर्म्युलेशनच्या किमती सरकारनं निश्चित केल्या आहेत.यामध्ये डायबिटीज, पेनकिलर, हार्ट, लिवर, एंटासिड, इन्फेक्शन, एलर्जी, मल्टीविटामिन, एंटीबायोटिक्ससह तब्बल ४१ औषधांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ४१ औषधे स्वस्त होणार आहेत. त्यामुळे
रुग्णांना आता या औषधांसाठी जास्त खर्च करावा लागणार नाही.
लवकरच नव्या आणि किफायतशीर किमतींसह ही औषधं बाजारात उपलब्ध होणार आहेत.
औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय National Pharmaceuticals Pricing Authority (NPPA) च्या १४३ व्या बैठकीत घेण्यात आला. NPPA च्या निर्णयानंतर गॅजेट नोटिफिकेशनही जारी करण्यात आलं आहे. तसेच, कंपन्यांना तात्काळ डीलर्स, स्टॉकिस्टना यासंदर्भात माहिती देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. यासोबतच औषध कंपनीनं जीएसटी भरला असेल तरच औषध कंपनी ग्राहकांकडून औषधाच्या किमतींव्यतिरिक्त जीएसटी आकारू शकते, असेही स्पष्ट केले आहे.
साधारणपणे, संसर्ग आणि ॲलर्जी व्यतिरिक्त, या मल्टीविटामिन आणि ॲन्टीबायोटिक्सच्या किंमती जास्त असतात. ज्यामुळे सामान्य उपचारांचा खर्च देखील जास्त होतो. त्यामुळे ही ४१ औषधे स्वस्त झाल्यानं सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्येही एनपीपीएनं मधुमेह आणि उच्च रक्तदाब या दोन्हींमध्ये वापरल्या जाणाऱ्या ६९ औषधांच्या किमती कमी केल्या होत्या. NPPA ने या आजारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ६९ औषधांच्या फॉर्म्युलेशनची किरकोळ किंमत निश्चित केली होती आणि ३१ फॉर्म्युलेशनच्या औषधांच्या किमती ठरवल्या होत्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
smoke
16.1 ° C
16.1 °
16.1 °
67 %
0kmh
0 %
Fri
27 °
Sat
28 °
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!