19.1 C
New Delhi
Friday, November 22, 2024
Homeआरोग्यकेस गळती कशी नियंत्रितीत करावी?

केस गळती कशी नियंत्रितीत करावी?

जाणून घ्या मक्याच्या कणसाचे फायदे

कणीस खायला जेवढे चविष्ट वाटते तेवढेच ते आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. तुम्ही याचा अनेक प्रकारे अन्नामध्ये वापर करू शकता. कणीस ज्याला आपण कॉर्नही म्हणतो त्यामध्ये फायबर आणि अँटी ऑॅक्सिडंट गुणधर्म आढळतात. जे पचन व्यवस्थित ठेवतात आणि अनेक आजारांपासून तुमचं रक्षण करतात. कॉर्नचे इतरही अनेक उत्तम फायदे आहेत. जाणून घेऊया…
हैदराबाद : तुम्ही कणीस खाल्ले असेल. पावसाळ्यात लोकांना भाजलेलं कणीस खायला खूप आवडतं. या ॠतूत गरमागरम कॉर्न खाण्याचा एक वेगळाच आनंद असतो. त्यामुळे पावसाळ्यात अनेक आजारांपासून तुमचं संरक्षण होतं. यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. कॉर्न हे सुपरफूड म्हणून ओळखले जाते. त्यात फॅट, कार्बोहायड्रेट, प्रथिने आणि फायबर पुरेशा प्रमाणात आढळतात. चला तर मग जाणून घेऊया, कॉर्न आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे.
 पचनासाठी फायदेशीर : बदलत्या ॠतूमध्ये पचनाच्या समस्या सामान्य असतात. या प्रकरणात आपण आपल्या आहारात कॉर्न समाविष्ट करू शकता. त्याचा वापर करून तुम्ही आरोग्यदायी गोष्टी बनवू शकता. कॉर्न फायबरचा एक समृद्ध स्रोत आहे, ज्यामुळे पचन सुधारतं. त्यामुळे बद्धकोष्ठतेसह अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.
 एनर्जी बूस्टर म्हणून काम करते : कॉर्नमध्ये भरपूर स्टार्च आणि पाणी असतं. यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असतं, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. कणीस खाल्ल्यानं शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते.
 कोलेस्ट्रॉल कमी करण्यास उपयुक्त : मक्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. ज्याद्वारे तुम्ही हृदयाशी संबंधित आजारांपासून दूर राहू शकता. यामध्ये व्हिटॅमिन-सी आणि कॅरोटीनोइड आढळतात, ज्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते.
 वजन कमी करण्यासाठी मदत : कॉर्नमध्ये कॅलरीजचं प्रमाण कमी असतं. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही तुमच्या आहारात कॉर्नचा समावेश करू शकता. यामुळे तुमचं पोट जास्त काळ भरलेलं राहतं आणि वजन कमी होण्यास मदत होते.
 केस गळण्यावर नियंत्रण : खराब आहार, धूळ, प्रदूषण यामुळे केसांच्या समस्या अलिकडे वाढल्या आहेत. केस मजबूत ठेवण्यासाठी आपल्या आहाराची विशेष काळजी घ्या. कणीस खाल्ल्यानं केसांची मुळे मजबूत होतात. यामुळे केसगळतीच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.
 चमकदार त्वचेसाठी : त्वचेसाठी आवश्यक असलेलं व्हिटॅमिन-सी, थायामिन, नियासिन, व्हिटॅमिन ई आणि इतर पोषक घटक कॉर्नमध्ये आढळतात. त्यात लाइकोपीन असते, जे अतिनील किरणांशी लढते आणि कोलेजनचं उत्पादन वाढविण्यास मदत करतं.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
smoke
19.1 ° C
19.1 °
19.1 °
63 %
0kmh
0 %
Fri
22 °
Sat
28 °
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!