पुणे- : संपूर्ण देशाच्या तुलनेत बहुतांश पुणेकरांना मानसिक व्याधी भेडसावत आहेत. त्यातही चिंतेने (अॅन्झायटी) ग्रस्त असलेल्यांची संख्या अधिक आहे आणि त्यातही १८ ते २५ या वयोगटातील युवकांची संख्या खूप आहे, अशी धक्कादायक माहिती एम्पॉवर संस्थेच्या विश्लेषणातून समोर आली आहे.
आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टची घटक असलेल्या आणि एक अग्रगण्य मानसिक आरोग्य सेवा प्रदाता असलेल्या एम्पॉवरने आपल्या ९व्या वर्धापनदिनानिमित्त आज राष्ट्रीय पातळीवर प्राप्त झालेल्या एक लाखापेक्षा जास्त मानसिक आरोग्य कॉल्सचे सर्वसमावेशक विश्लेषण जारी केले. एम्पॉवर १-ऑन-१ लेट्स टॉक (१८००- १२०- ८२००५०) या टोल-फ्री हेल्पलाईनवर हे कॉल प्राप्त कऱण्यात आले. यात संपूर्ण भारतातील कॉल व्हॉल्यूममध्ये सर्वाधिक कॉ़ल पुण्यातून आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पुणे हे एक महत्त्वाचे योगदानकर्ता म्हणून उदयास आले. विशेष म्हणजे,यामध्ये ५७ टक्के पुरुष आणि ४३ टक्के महिला कॉलर्सनी मदतीची मागणी केली. त्यामुळे अनोखे लैंगिक वितरण या कॉलर्समध्ये दिसून आले. पुण्यातील पुरुषांमध्ये मानसिक आरोग्य समुपदेशनासाठी मोकळेपणा वाढत असल्यावर हा ट्रेंडमधून प्रकाश पडतो.
या विश्लेषणाच्या महत्त्वाच्या निष्कर्षांमध्ये आढळले, की पुण्यात नातेसंबंधातील समस्या ही प्रमुख चिंतेची बाब आहे. एकूण कॉल्सपैकी ३२ टक्के कॉल्स या समस्येशी संबंधित होते. राष्ट्रीय आकडेवारीच्या तुलनेत पुण्यामध्ये चिंताग्रस्तांचे प्रमाण २६ टक्के असल्याचे आढळले. या वाढलेल्या चिंतेला शहराचे वेगवान शहरी वातावरण कारणीभूत असू शकते. स्पर्धात्मक शैक्षणिक आणि व्यावसायिक दबाव आणि उच्च-दबाव असलेली जीवनशैली हे त्याचे निदर्शक आहे.
राष्ट्रीय ट्रेंडच्या तुलनेत पुण्याचे आणखी एक वेगळेपण उठून दिसते. पुण्यातील कॉलर्सपैकी ५१ टक्के एवढे लक्षणीय प्रमाण १८- २५ वयोगटातील युवकांचे आहे. त्यातून तरुण प्रौढांसाठी मानसिक आरोग्यासाठी मदतीची तातडीची गरज असल्याचे अधोरेखित होते. तरुण प्रौढांच्या जीवनाची गुणवत्ता आणि आर्थिक योगदानावर सुप्त मानसिक आरोग्य समस्यांच्या लक्षणीय प्रभावाबाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या निष्कर्षांशी हे निष्कर्ष सुसंगत आहेत.
पुणे येथील आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल येथील एमपॉवर द सेंटरमधील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. स्नेहा आर्य म्हणाल्या, “पुण्यामध्ये शिक्षणावर असलेला भर आणि अत्यंत स्पर्धात्मक व्यावसायिक वातावरण यामुळे मानसिक आरोग्यावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. वाढलेली जागरूकता आणि मानसिक आरोग्याचे सुलभ स्रोत, विशेषत: तरुण प्रौढांसाठी, महत्त्वाचे आहेत. लवकर उपचार मिळाल्यास त्यांचे एकूण स्वास्थ्य आणि उत्पादकतेमध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकते.”
पुण्यातील मानसिक आरोग्याच्या समस्यांमध्ये योगदान देणारे घटक:
कामाशी संबंधित ताण: कामाचे दीर्घ तास, काटेकोर डेडलाईन आणि संस्थात्मक अपेक्षांमुळे वैयक्तिक स्वास्थ्यासाठी आणि नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी कमी वाव मिळतो.
शैक्षणिक दबाव: पुण्यासारख्या शिक्षणाच्या माहेरघरी विद्यार्थ्यांना भेडसावणारे तीव्र शैक्षणिक आणि सामाजिक दबाव तणावाच्या पातळीत आणि चिंतेमध्ये महत्त्वाची भर घालतात.
शहरी जीवनशैलीचा ताण: लांब प्रवास, भयंकर रहदारी आणि मर्यादित वैयक्तिक निवांत वेळ यामुळे चिंता आणि तणाव वाढतात.
गेल्या नऊ वर्षांमध्ये, एम्पॉवरने थेट मदत करून २,१४३,०९८ हून अधिक जीवनांना स्पर्श केला आहे आणि जनजागृती उपक्रमांद्वारे ती १६५,४६०,००० लोकांपर्यंत पोहोचले आहे. पुणेकरांना सुलभ आणि प्रभावी मानसिक आरोग्य सेवा देण्यासाठी एमपॉवर समर्पित आहे. आपण किंवा आपल्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीला त्रास होत असल्यास, कृपया गोपनीय सहाय्य आणि मार्गदर्शनासाठी पुण्यातील एम्पॉवर केंद्राशी संपर्क साधा किंवा एम्पॉवर १-ऑन-१ लेट्स टॉक मानसिक आरोग्य हेल्पलाइनला १८००-१२०- ८२००५० वर कॉल करा.